लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : घोडबंदर येथील कासारवडवली भागात मेट्रो मार्गिकेवर तुळई बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी घोडबंदर मार्गावर वाहतूक बदल पोलिसांनी लागू केले असून यानुसार, ११ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत रात्री १२ ते पहाटे ४ यावेळेत अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर प्रवेश बंदी असणार आहे. ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

Mumbai, Speed ​​limit,
मुंबई : राम मंदिर – गोरेगाव – मालाड विभागात वेगमर्यादा
2nd October Rashi Bhavishya & Panchang
२ ऑक्टोबर पंचांग: सर्वपित्री अमावस्या कोणासाठी ठरणार शुभ?…
Water Logging due to heavy rainfall at Bhandup railway station.
Mumbai Local Train Updates : पावसामुळे १०० लोकल फेऱ्या रद्द; मेल-एक्स्प्रेस आठ तास खोळंबल्या
Chemical tanker accident on mumbai ahmedabad highway
पालघर : महामार्गावर रसायनाचा टँकर उलटला; रसायन घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड
Vasai, Crime Branch-2, dead body, Vasai crime news,
वसई : गुन्हे शाखा-२ च्या पथकाची जलद कामगिरी, महामार्गावर आढळलेल्या मृतदेहाच्या हत्ये प्रकरणात तृतीयपंथीय ताब्यात
Block, bridge girder, bridge girder thane station,
मुंबई : पुलाची तुळई उभारण्यासाठी ब्लॉक
Shiv-Panvel highway, Shiv-Panvel highway potholes ,
मुंबई : शीव-पनवेल महामार्ग खड्ड्यांतच
Ten accused who blocked vehicles on the highway and committed robberies arrested in Chhattisgarh
वर्धा: सिनेस्टाईल पाठलाग; महामार्गावर दरोडे टाकणाऱ्या टोळीस बेड्या

घोडबंदर मार्गावरुन मोठ्याप्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरु असते. या मार्गावर मेट्रो मार्गिका ४ चे काम सुरु आहे. या कामामुळे घोडबंदर गायमुख घाटात वाहतूक कोंडी होत असते. या मेट्रो मार्गिका ४ चे नागलाबंदर सिग्नल ते इंडियन ऑईल पंप दरम्यान आय आणि यू आकारातील तुळई टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे कोणताही अपघात घडू नये यासाठी वाहतूक पोलिसांनी घोडबंदर मार्गावर वाहतूक बदल लागू केले आहेत.

आणखी वाचा-कसारा रेल्वे स्थानकात मोटरमन केबिनमध्ये चित्रफित तयार करणारे नाशिकचे दोन तरूण अटकेत

या कामादरम्यान घोडबंदरकडे जाणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना पिलर क्रमांक ८५ जवळ प्रवेश बंदी असणार आहे. ही वाहने ठाणे वजनकाटा जवळून सेवारस्ता मार्गे पुढे इंडियन ऑईल पंपासमोर मुख्य रस्त्याने इच्छित स्थळी जातील. हे वाहतूक बदल ११ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत लागू राहतील, अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली.