लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील विविध महत्त्वकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत येत आहेत. अवजड वाहनांमुळे नवी मुंबईत कोंडी होऊ नये म्हणून उद्या, शुक्रवारी ठाण्यात अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागू केली आहे.

smart parking lots , Nashik , traffic Nashik ,
नाशिक शहरातील ३३ स्मार्ट वाहनतळांचे पुनरुज्जीवन, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Sudhir Mungantiwar , Chandrapur Power Station,
“…तर चंद्रपूर वीज केंद्रातील दोन संच बंद करू,” मुनगंटीवार यांचा इशारा
Thane Traffic Branch, Thane Police ,
ठाणे वाहतूक शाखेच्या विभाजनाचा प्रस्ताव, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी ठाणे पोलिसांची निर्णय
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
ST bus brakes fail at Anaskura Ghat Drivers saves 50 passengers lives
अणस्कुरा घाटात एसटी बसचे ब्रेक निकामी; चालकाच्या प्रसंगावधाने वाचले ५० प्रवाशांचे प्राण
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
Heavy vehicles banned in Narhe area on outer ring road
पुणे : बाह्यवळण मार्गावरील नऱ्हे परिसरात जड वाहनांना बंदी

गुजरात राज्य आणि भिवंडी येथून हजारो अवजड वाहने उरण जेएनपीटी येथे वाहतुक करत असतात. ही अवजड वाहने ठाण्यातील मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा मार्गे नवी मुंबईत जातात. तसेच नाशिक येथून सुटणाऱ्या अवजड वाहनांचा भारही या मार्गावर मोठा असतो. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे पाच या वेळेत वाहतुक करण्यास मुभा आहे.

आणखी वाचा-पक्ष, संघटना प्रायव्हेट लिमीटेड कंपनी म्हणून चालविता येणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी नवी मुंबईत येणार आहेत. या कालावधीत मोठ्याप्रमाणात नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दुपारी अवजड वाहनांचा भार वाढल्यास कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी अवजड वाहनांना पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत अवजड वाहनांना वाहतुक करण्यास प्रवेश बंदी केली आहे.

Story img Loader