ठाणे : घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू असल्याने १८ जुलैपर्यंत रात्री ११.५५ ते पहाटे ५ या वेळेत घोडबंदर मार्गावर जड अवजड वाहनांना बंदी लागू केली आहे. अवजड वाहनांची वाहतूक कापूरबावडी येथून भिवंडी, कशेळी भागातून वळविण्यात येणार आहे. त्यामुळे या पर्यायी मार्गावर रात्री वाहनांचा भार वाढणार आहे
गुजरात येथून हजारो अवजड वाहने घोडबंदर मार्गे उरण जेएनपीटीच्या दिशेने वाहतूक करत असतात. गेल्याकाही वर्षांपासून घोडबंदर मार्गावर वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेचे काम सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून मानपाडा ते कापूरबावडी येथे तुळई उभारण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत दुर्घटना घडू नये म्हणून ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेने अवजड वाहनांना घोडबंदर मार्गावर बंदी असणार आहे.
हेही वाचा – डोंबिवलीत झाड, विजेचा खांब कोसळल्याने वाहतूक कोंडी
१८ जुलैपर्यंत दररोज रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल. येथील वाहने कापूरबावडी येथून कशेळी, काल्हेर तसेच अंजुरफाटा मार्गे वळविण्यात येणार आहे.