ठाणे : घोडबंदर येथील मानपाडा भागात मंगळवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास महावितरणच्या विद्युत मनोऱ्यावरील उच्चदाब वाहिनी तांत्रिक बिघाडामुळे तुटली. हा विद्युत मनोरा गृहसंकुलाजवळ आहे. सुदैवाने घटना घडली त्यावेळी परिसरात कोणीही नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. वाहिनी तुटल्याने भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याची समजत होते.

मानपाडा येथील खेवरा चौक परिसरात महावितरणच्या उच्चदाब वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड होऊन वाहिनी तुटून ती एका गृहसंकुलाजवळ पडली. या घटनेची माहिती गृहसंकुलाच्या सदस्यांनी महावितरण कंपनीला दिल्यानंतर कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील भाग प्रतिबंधित केला आहे. या प्रकारामुळे भागातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्याचे कळत होते. गृहसंकुलातील रहिवाशांनी यापूर्वीच हा मनोरा संकुलाच्या परिसरातून हटविण्याची मागणी केली होती. परंतु महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.

Story img Loader