लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: कल्याण, शहापूर, टिटवाळा परिसरात घरफोड्या करणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुण घरफोड्याला खडकपाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून आठ घरफोड्यांमधील ४७ तोळे सोने, एक लॅपटॉप, मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.

mhalunge police arrested house robber seizing 26 jewelry pieces worth ₹18 lakh
घरफोडीतील आरोपी टी-शर्टच्या आधारे ओळखून पकडला
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Drug dealer, Katraj, Drug , Charas,
कात्रज भागात अमली पदार्थ विक्री करणारा गजाआड, एक लाखांचे चरस जप्त
forest tiger hunt marathi news
वाघाच्या शिकारीचे धागेदोरे सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यापर्यंत !
Three-year-old girl kidnapped in Worli kidnapper arrested within three hours
वरळीत तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण, तीन तासात अपहरणकर्त्या महिलेला अटक
Gang of six arrested, cyber fraud, bank accounts ,
सायबर फसवणुकीसाठी बँक खाते पुरविणारी सहा जणांची टोळी अटकेत
47 year old Tanzanian was arrested with 55 cocaine capsules worth 7 5 crore rupees at mumbai airport
साडेसात कोटींच्या कोकेनसह टान्झानियाच्या नागरिकाला अटक, कोट्यावधीचे परदेशी चलन व सोने जप्त
Auto rickshaw driver arrested for molesting student mumbai print news
मुंबईः विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अटक

रोशन बाळ जाधव (३२, रा.निळजेपाडा, गावदेवी मंदिराजवळ, डोंबिवली) असे अटक करण्यात आलेल्या घरफोड्याचे नाव आहे. त्याने मास मिडियापर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तीन वर्ष तो एका वृत्तपत्रात नोकरीला होता, अशी माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.

वर्तमानपत्रात काम करत असताना रोशनला डान्स बारमध्ये जाण्याचे व्यसन लागले. दररोज पैशांची चणचण जाणवू लागली. ही गरज भागविण्यासाठी तो घरफोड्या करू लागला. सीसीटीव्ही, रखवालदार नसलेल्या सोसायट्या हेरुन तेथील बंद घरांमध्ये रोशन दिवसा, रात्री चोऱ्या करत होता, असे उपायुक्त गुंजाळ यांनी सांगितले.

आणखी वाचा- डोंबिवलीतील खासगी सावकाराचे काटई गावातील हॉटेलमधून अपहरण

मोहने येथील रहिवासी सुरेश पाटील यांच्या घरातून गेल्या आठवड्यात दिवसा ३५ तोळे सोने चोरीला गेले होते. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास सीसीटीव्ही चित्रणातील चोरट्याची छबी आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरू केला होता. साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या आदेशावरुन खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक शरद झिने, साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी शहाड भागात गस्तीवर असताना एका संशयित इसमाला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात त्याची चौकशी केल्यावर त्याने आपण कल्याण, टिटवाळा, शहापूर भागात एकूण आठ घरफोड्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. रोशन जाधव अशी त्याने ओळख दिली. खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीत त्याने पाच, टिटवाळा येथे दोन, शहापूर येथे एक चोरी केली आहे. त्याने आणखी काही चोऱ्या केल्या आहेत का. त्याला इतर कोणी साथीदार होते का याचा तपास पोलीस करत आहेत.

“ कल्याण परिसरातील घरफोड्यांचा तपास करत असताना आरोपी रोशन जाधव पकडला गेला. तो उच्चशिक्षित आहे. त्याने आठ घरफोड्यांची कबुली दिली आहे. त्याची चौकशी सुरू आहे.” -सचिन गुंजाळ, पोलीस उपायुक्त, कल्याण.

Story img Loader