हिंगे ब्रदर्स, बदलापूर
आधुनिकीकरणाने जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. मानवी जीवनाचा अविभाज्य घटक असलेली संगीत कलाही त्याला अपवाद नाही. इलेक्ट्रॉनिक वाद्यांद्वारे हवे तेव्हा सप्तसूर उपलब्ध होत असले तरी पारंपरिक वाद्यांतून निघणाऱ्या नैसर्गिक सुरांची मोहिनी अजूनही कायम आहे. त्यामुळेच वाट्टेल ती सुरावट एका कळीनिशी उमटविण्याची क्षमता असणाऱ्या सिंथेसायझरच्या जमान्यातही पारंपरिक हार्मोनियम अथवा पेटी संगीत मैफलींमधील आपले स्थान टिकवून आहे. दीडशे वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या सुरांच्या पेटीला शास्त्रीय बैठकीत मानाचे स्थान मिळवून देण्यात बदलापूरमधील हिंगेबंधूंचे फार मोठे योगदान आहे. हार्मोनियम दुरुस्ती आणि निर्मिती क्षेत्रात सध्या ‘हिंगे’ भारतातील एक प्रमुख उत्पादक म्हणून गणले जातात. राजेंद्र आणि जितेंद्र हिंगे हे दोन भाऊ गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ विविध प्रकारच्या वाद्यांची निर्मिती करीत असले तरी प्रामुख्याने हिंगे म्हणजे हार्मोनियम असे समीकरणच बनले आहे.
हिंगे कुटुंबीय मूळचे पुण्यातील राजगुरू नगरचे. तिथे कृष्णाजी हिंगे यांचा खाद्यतेल निर्मितीचा व्यवसाय होता. राजेंद्र आणि जितेंद्र या त्यांच्या दोन्ही मुलांनी मात्र सुरांची वाट धरली. त्यांना सुरांचा वारसा, मार्गदर्शन आजोळी मिळाले. त्यांचे आजोबा एकनाथ दसककर ग्वाल्हेर घराण्याचे गायक होते. दोन्ही मामा संगीत शिक्षक. त्यामुळे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजेंद्र आणि जितेंद्र या दोघांनीही सुरुवातीला हार्मोनियम दुरुस्तीचा उद्योग सुरू केला. या विषयातील प्राथमिक शिक्षण त्यांना कृष्णराव दसककर या
डोंबिवलीत राहणाऱ्या मामाकडून मिळाले. यथावकाश त्यांनी मागणीनुसार नवीन हार्मोनियम बनवून देण्यास सुरुवात केली. सर्वसाधारणपणे हार्मोनियम तीन-चार कारागीर मिळून करतात. प्रत्येक कारागीर एकेक सुटा भाग बनवतो. नंतर त्यांची जुळणी केली जाते. एकहाती हार्मोनियमची बांधणी करणारे कारागीर दुर्मीळ आहेत. सुरुवातीच्या काळात हिंगेबंधूंनीही हार्मोनियम बनविण्यासाठी कारागीर ठेवले. मात्र कारागिरांमध्ये मोठय़ा प्रमाणात आढळून येणारी व्यसनाधीनता आणि अर्धवट शास्त्रीय ज्ञानामुळे हार्मोनियम निर्मितीत त्रुटी राहात असत. हार्मोनियम बनविणाऱ्या अनेकांना ती वाजविता येत नाही. त्यामुळे त्यांना गायक आणि वादकांच्या गरजा लक्षात येत नाहीत. हार्मोनियन निर्मिती उद्योगातील हे वास्तव लक्षात आल्यावर हिंगेबंधूंनी त्यातील हे दोष काढून टाकण्याचे ठरविले. १९८४ मध्ये त्यांनी हार्मोनियम निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला. हार्मोनियम दुरुस्ती, निर्मिती तसेच वादन या तिन्ही विषयांतील बारकावे त्यांनी शिकून घेतले. एकीकडे पूर्णवेळ या उद्योगात कार्यरत असताना फावल्या वेळेत त्यांनी त्यांचे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण केले. राजेंद्र यांनी अर्थशास्त्रात एम.ए. केले तर जितेंद्र बी.एस्सी. झाले. हार्मोनियमव्यतिरिक्त हिंगेबंधू गिटार, सतार, तानपुरा, तबला, मृदुंग, ढोलक, ढोलकी, बुलबुल तरंग, सरस्वती वीणा, दिलरूबा आदी वाद्ये बनवितात. जितेंद्र हिंगे पियानोचे टय़ूनिंग करण्यातही पारंगत आहेत. ‘यामाहा’ कंपनीने उत्कृष्ट टय़ूनर म्हणून त्यांचा गौरव केला आहे.

दिग्गज कलावंतांची पसंती
या नवीन हार्मोनियममधून निघणारे सूर आवाजाशी अधिक मिळतेजुळते आहेत. त्यात कमालीचे माधुर्य असल्याचे दिग्गज कलावंतांनी त्याला पसंती दिली. सीमा शिरोडकर, शंकर महादेवन, वीणा सहस्रबुद्धे, श्रीधर फडके, बप्पी लहरी, पद्मजा फेणाणी, सुवर्णा माटेगांवकर, पराग माटेगांवकर, आशीष मुझुमदार, मिथीलेष पाटणकर, दीपक मराठे आदी कलावंत आवर्जून हिंगे स्वरांजलीची हार्मोनियम वापरतात. याशिवाय लुईस बँक्स, रूपकुमार राठोड, संगीतकार उत्तम सिंग, रिचर्ड अ‍ॅम्बल आणि अमन बाथला हे कलावंत कार्यक्रमाआधी जितेंद्र हिंगेंकडून पियानोचे टय़ूनिंग करून घेतात.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
wall-painted calendar in the Roman Republic
भूगोलाचा इतिहास : एका खेळियाने…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
Grandparents got married again In 60th Wedding Anniversary
‘एक नात आयुष्यभराच…’ गजऱ्याच्या मुंडावळ्या बांधून आजी-आजोबा उभे राहिले लग्नाला; VIRAL VIDEO एकदा बघाच
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
Shivajinagar Constituency BJP Vs Congress Rebellion in Congress Congress nominated Dutta Bahirat against BJP MLA Siddharth Shirole Pune
शिवाजीनगरमध्ये ‘सांगली पॅटर्न?’

दिखाऊ आणि टिकाऊ
हार्मोनियम निर्मितीत सातत्याने सुधारणा हे हिंगेबंधूंचे वैशिष्टय़ आहे. ती उत्तम वाजली पाहिजे. टिकली पाहिजे, तसेच मैफलीत ही जादूची पेटी उठूनही दिसली पाहिजे, याकडे त्यांचा कटाक्ष असतो. हार्मोनियमची बांधणी सागाच्या (सीझम बर्मा) लाकडापासून होते. की-बोर्ड ओकवूडपासून बनविला जातो. सर्वसाधारणपणे उत्तम पद्धतीने बनविलेले हार्मोनियम शतायुषी असते. बदलापुरात बनवल्या जाणाऱ्या हिंगेबंधूंच्या हार्मोनियमची कीर्ती दिग्गज गायक-वादकांच्या शिफारशींमुळे जगभर पोहोचली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्याकडे हार्मोनियम बनविण्याच्या ऑर्डर्स येतात. बदलापूरव्यतिरिक्त डोंबिवलीत कस्तुरी प्लाझा येथे त्यांचे वाद्यांचे दुकानही आहे.

‘स्वरांजली’चे पेटंट
हार्मोनियम वादन शिकल्याने हिंगेबंधूंना त्यातील मर्यादा लक्षात आल्या. विशिष्ट पद्धतीच्या टय़ूनिंगमुळे (क्रोमोटिक) हार्मोनियमला शास्त्रीय संगीताच्या मैफलीत फारसे मानाचे स्थान नव्हते. शास्त्रीय संगीतासाठी खास गंधार पद्धतीचे टय़ूनिंग आवश्यक असते. तशा पद्धतीचे टय़ूनिंग हवे असल्यास गायक अथवा वादकाला प्रत्येक स्वरपट्टीसाठी स्वतंत्र हार्मोनियम विकत घ्यावी लागे. ते अव्यवहार्य तसेच खर्चीक होते. हिंगेबंधूंनी संशोधनाअंती निरनिराळ्या स्वरपट्टय़ांचे गंधार टय़ूनिंग एकाच हार्मोनियममध्ये उपलब्ध करून दिले. त्याला त्यांनी ‘हिंगे स्वरांजली’ असे नाव दिले. त्यांच्या या ‘हिंगे स्वरांजली’चे वैशिष्टय़ म्हणजे एकाच हार्मोनियममध्ये वेगवेगळ्या स्वरपट्टय़ांचे गंधार टय़ूनिंग, क्रोमोटिक किंवा अ‍ॅकॉर्डियन पद्धतीचे टय़ूनिंग उपलब्ध झाले. या नव्या हार्मोनियमचे हिंगेंनी पेटंट घेतले. त्यासाठी त्यांना विवेक दातार यांनी मदत केली.