ऐतिहासिक कल्याण शहराच्या सत्ताकारणाचा केंद्रबिंदू मानला जाणारा सुभेदार वाडा म्हणजे शहराच्या अस्मितेची एक ठळक खुण होती. शहराचा प्रमुख असलेला सुभेदार या वाडय़ातून राज्य कारभार करीत असे. कल्याण भेटीत शिवाजी महाराजांनी या वाडय़ात वास्तव्य केले होते. कालानुरूप जुना वाडा जीर्ण झाल्याने तोडून टाकावा लागला. तिथे आता जनरल एज्युकेशन इस्न्टिटय़ूट या संस्थेची शाळा भरते. शहरातील एक प्रमुख शैक्षणिक केंद्र असणारी ही शाळाही सुभेदार वाडा शाळा या नावानेच ओळखली जाते. या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शहरवासियांसाठी सुभेदार वाडा कट्टा नावाने एक सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. जून महिन्यापासून नियमितपणे या कट्टय़ावर कार्यक्रम होणार आहेत. 

Story img Loader