ठाणे : ठाण्यात ‘हिट अँड रन’चा प्रकार समोर आला आहे. एका मर्सिडीज कारच्या धडकेत दर्शन हेगडे (२१) याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
हे ही वाचा… डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट पाचवरील प्रवासी उतार मार्गिका सोमवारपासून बंद
वागळे इस्टेट येथील कामगार रुग्णालय परिसरात दर्शन हेगडे हा वास्तव्यास होता. सोमवारी मध्यरात्री तो दुचाकीने खाद्यपदार्थ आणण्यासाठी निघाला होता. मध्यरात्री १.५० वाजताच्या सुमारास तो नितीन कंपनी जंक्शन परिसरात आला असता, एका भरधाव मर्सिडीज कारमधील चालकाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर चालकाने तेथून पळ काढला. या धडकेत दर्शन यांच्या डोक्याला आणि हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.