आपल्या घरातलं कुंडीतलं झाड फक्त घराची शोभा वाढवण्याव्यतिरिक्त आपल्याला अनेक अंगांनी उपयोगी पडतं.
पारंपरिकरीत्या देवतांचा आणि झाडांचा संबंध आपल्याला माहीत असतो आणि त्याप्रमाणे पूजेत त्याचा उपयोगही आस्तिक व्यक्ती करतात. उदा. शंकराला बेल आवडतो आणि पांढरी फुले आवडतात, तर गणपतीला दूर्वा आणि लाल फुले श्रीकृष्ण आणि विठ्ठल यांना तुळस आवडते, तर देवीला रंगीत सुवासिक फुले.आपल्याला कोणते झाड उपयोगी आहे याची माहिती फार पूर्वीपासून चालत आली आहे.
आपल्याला कोणते झाड उपयोगी आहे याची माहिती फार पूर्वीपासून चालत आली आहे. मात्र खूप जणांना ती माहिती नसते. प्रत्येकाची विशिष्ट जन्मवेळ आणि जन्मठिकाण असते. त्यानुसार त्या व्यक्तीची रास आणि नक्षत्र समजू शकते. रास आणि नक्षत्र या संज्ञा खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात वापरल्या जातात. आपल्या पूर्वजांनी अभ्यास करून प्रत्येक नक्षत्राच्या व्यक्तीसाठी काही विशिष्ट झाडं नेमून दिली आहेत. या झाडांची त्या व्यक्तीच्या आयुष्यात विशिष्ट भूमिका असते. अशा वृक्षांना ‘नक्षत्रवृक्ष’ आराध्यवृक्ष ही संज्ञा आहे. सर्वसाधारणपणे त्या त्या व्यक्तीला होणाऱ्या विकारांमध्ये हे नक्षत्रवृक्ष औषधांसारखे उपयोगी पडतात. विशिष्ट नक्षत्रवृक्ष जर उपलब्ध नसेल तर त्यासाठी पर्यायी वृक्षदेखील आपल्या पूर्वजांनी नेमून दिले आहेत, की जे सहजपणे उपलब्ध असतात. याचबरोबर प्रत्येक नक्षत्रासाठी
धायरषधी वृक्षांचा एखादा ठरावीक भाग अंगावर धारण केल्याने त्या व्यक्तीस विकारमुक्तता मिळते अशी संकल्पना येथे आहे.
नक्षत्रवृक्ष अथवा आराध्यवृक्ष यांची आराधना अर्थात उपासना करणे येथे अपेक्षित आहे आणि त्यासाठी त्या वृक्षाचे सान्निध्य अपेक्षित आहे. हे लक्षात घेऊन ते झाड आपण कुंडीत नक्कीच लावलं पाहिजे. झाड जरी ‘वृक्ष’ वर्गातलं असलं तरी योग्य रीतीने छाटणी करून त्याचा आकार आपण मर्यादित ठेवू शकतो. जागा असेल त्याप्रमाणे घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या नक्षत्राप्रमाणे ती ती झाडं कुंडीत लावून त्यांचे सान्निध्य आपण अनुभवले पाहिजे.
माहितीसाठी प्रत्येक नक्षत्र आणि त्याचा आराध्यवृक्ष याची यादी पुढे देत आहे-
१) अश्विनी- कुचला २) भरणी- आवळा ३) कृत्तिका- उंबर ४) रोहिणी- जांभूळ ५) मृग- खैर ६) आद्र्रा- कृष्णागस ७) पुनर्वसु- वेळू ८) पुष्य- पिंपळ ९) आश्लेषा- नागचाफा १०) मघा- वड ११) पूर्वा फाल्गुनी- पळस १२) उत्तरा फाल्गुनी- पायरी १३) हस्त- जाई १४) चित्रा- बेल १५) स्वाती- अर्जुन १६) विशाखा- नागचाफा १७) अनुराधा- नागचाफा १८) ज्येष्ठा- सावर १९) मूळ- राळ २०) पूर्वाषाढा- वेत २१) उत्तराषाढा- फणस २२) श्रवण- रुई २३) धनिष्ठा- शमी २४) शततारका- कळंब २५) पूर्वाभाद्रपदा- आंबा २६) उत्तराभाद्रपदा- कडुनिंब २७) रेवती- मोह.
नक्षत्र, आराध्यवृक्ष, पर्यायीवृक्ष, धायरषधी याविषयी माहिती पंचांगात पूर्वापार चालत आली आहे. जागेअभावी पर्यायीवृक्ष आणि धायरषधी वृक्षांची नावे इथे देऊ शकत नाही. आराध्यवृक्षांची पूजा करून अर्थात त्यांचे सान्निध्य आणि त्यांच्याशी मैत्री करून शारीरिक आणि मानसिक फायदे झाल्याचे नमूद केलेले आढळते. मी स्वत: या गोष्टींचा प्रवर्तक आहे. पर्यायी वृक्ष, धायरषधी वृक्ष, त्यांची उपासना कशी करावी, त्या वेळी कोणते मंत्र म्हणणे अपेक्षित आहेत ही माहिती देणारी पुस्तके आज उपलब्ध आहेत.
कुंडीतला आपला आराध्यवृक्ष आपल्यावर निव्र्याज आणि अखंड प्रेम करणारा ठरू शकतो. याचा अनुभव प्रत्येकाने आपापल्या परीने घ्यायचा आहे.
drnandini.bondale@gmail.com