अंबरनाथ शहरात पश्चिमेत प्रस्तावित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. या वसाहतींच्या उभारणीसाठी स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. फडणवीस यांनीही या वसाहतींच्या उभारणीसाठी निधी देण्याचे मंजूर केल्याची माहिती डॉ. किणीकर यांनी दिली आहे. त्यामुळे पोलीस वसाहतीच्या उभारणीच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबरनाथ शहराच्या पश्चिमेला असलेल्या पोलीस ठाण्याची इमारत जीर्ण झाली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी अंबरनाथ पोलीस ठाण्याचा कारभार मागच्या बाजूस असलेल्या क्रीडा संकूलाच्या वास्तूमध्ये हलवला होता. बैठ्या चाळवजा या वास्तूमधून अनेक वर्षांपासून पोलिसांचा कारभार चालतो. याच परिसराला लागून पोलीस वसाहती आहेत. या वसाहतींची अवस्थाही भीषण आहे. गळक्या खोल्या आणि जीर्ण झालेल्या या वास्तूमधून अनेक पोलीसांनी आपली कुटुंब इतरत्र हालवली आहेत. काही कुटुंब आजही येथे वास्तव्यास आहेत. या घरांच्या जागी नव्या इमारती उभारून त्या पोलीस कुटुंबियांना त्यात स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला होता.

हेही वाचा : ५०० ते हजार रुपयांत चिमुकल्या मुलांची वेठबिगारीसाठी खरेदी; ठाणे, पालघर जिल्ह्यातील चिमुकल्यांची नगरमधील मेंढपालाकडे वेठबिगारी

स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यासाठी आग्रही होते. आताच्या पोलीस वसाहतीच्या जागेवर एका मजल्यावर ८ सदनिका असलेल्या २५ मजल्यांची एक इमारत तर प्रत्येक मजल्यावर दोन सदनिका असलेल्या २५ मजल्यांच्या दुसऱ्या इमारतीचा प्रस्ताव मंजूर करणअयात आला होता. पोलीस गृहनिर्माण मंडळाच्या माध्यमातून वास्तूविशारद आणि तांत्रिक सल्लागाकरून यासाठीचे नकाशे मंजूर करत आराखडा तयार करण्य़ात आला होता. मात्र मध्यंतरीच्या काही वर्षात हा प्रस्ताव मागे पडला. या कामासाठी पुरेसा निधी उपलब्ध न झाल्याने काम सुरू होऊ शकले नाही. मात्र या कामाला पुन्हा गती देण्यासाठी आमदार डॉ. किणीकर यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

हेही वाचा : जलस्त्रोत काठोकाठ; बारवी, आंध्रा धरण भरले, जिल्ह्याची पाणीचिंता मिटली

नुकतीच डॉ. किणीकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना या रखडलेल्या प्रकल्पाबाबत माहिती दिली. हा प्रकल्प वेगाने सुरू व्हावा यासाटी विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती आमदार डॉ. किणीकर यांनी केली आहे. या प्रकल्पाबाबत ऐकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यासाठी लवकरच निधीची तरतूद केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home minister devendra fadnavis positive about funding police colonies in ambarnath tmb 01