ठाणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच काळय़ा यादीत टाकलेल्या लाइफ लाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सव्‍‌र्हिसेस या कंपनीला पाच कोविड सेंटरचे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाण्यात केला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मुलीच्या विवाहानिमित्ताने पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमांचे लाखो रुपयांचे बिल कोणी भरले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. नगरसेवक संजय वाघुले यांच्या  कार्यालयामध्ये सोमय्या हे आले होते. तिथे त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. पुणे येथील कोविड सेंटरमधील गैरव्यवहाराविरोधात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सर्व पुरावे देण्यात आले आहेत. परंतु त्याबाबत काहीही बोलले जात नाही  असा आरोप सोमय्या यांनी केला.   शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डनला माफी दिली, तरी त्यांना २१ कोटी रुपये भरावे लागतील. त्यासाठी भाजपकडून कायदेशीर लढाई  लढली जाईल, असे सोमय्या यांनी सांगितले.

Story img Loader