रुक्मिणीबाई रुग्णालयातील रुग्णांकडून जमा होणाऱ्या शुल्कात २८ लाख रुपयांचा गैरव्यवहार करणाऱ्या विश्वास ऊर्फ आप्पा कुलकर्णी या लिपिकावर मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
रुक्मिणीबाई रुग्णालयात रोखपाल विभागातील विश्वास कुलकर्णी रुग्णांकडून औषध उपचार, रुग्णांना घरी सोडताना जमा होणारे शुल्क जमा करण्याचे काम करीत असे. एखाद्या रुग्णाने २५०० रुपये भरणा केले तर वरच्या पावतीवर २५०० रुपये आणि नक्कल पावतीवर फक्त २५० रुपये टाकले जात असत, अशी कुलकर्णीची अपहार करण्याची पद्धत असल्याचे कर्मचाऱ्यांकडून बोलले जाते. अशा पद्धतीने कुलकर्णीने गैरव्यवहार केला आहे. आजारी असल्याचे नाटक कुलकर्णी करत असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या ‘खासगी’ बैठकीला कोणकोणत्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती असायची याचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा