कल्याण – कल्याणमध्ये हाॅटेलच्या एका स्वयंपाकीला तीन जणांनी किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात स्वयंपाकीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरत सोमनाथ शिंदे (२५) असे स्वयंपाकीचे नाव आहे. तो कल्याणमधील पोलीस वसाहतीसमोरील इंदिरानगर भागात राहतो. बुधवारी रात्रीच्या वेळेत हा प्रकार घडला आहे. स्वयंपाकी भरत शिंदे हा रात्रीच्या वेळेत हाॅटेलमध्ये ग्राहकांच्या माध्यमातून मिळालेले सुट्टे पैसे जवळच असलेल्या बिर्ला महाविद्यालयाजवळील कॅफे क्रिम दुकानात सुट्टे पैसे देण्यासाठी गेला होता. त्यावेळी कॅफे क्रिमच्या बाहेर असलेल्या एका पान टपरीच्या बाजुला एक इसम उभा होता. तो सिगारेट ओढत होता. त्याने कोणतेही कारण नसताना सिगारेटचा झुरका ओढून अचानक तोंडातील धूर स्वयंपाकी भरत यांच्या तोंडावर सोडला.

Lays Paneer Bites Recipe in marathi easy paneer recipe
१० रुपयांच्या चिप्सपासून बनवा पनीरचा ‘हा’ खास पदार्थ, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल बेस्ट! लगेच वाचा रेसिपी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mumbai Municipal Corporation sent notice to developer for careless demolition of building
अंधेरीत बांधकाम व्यवसायिकाला पालिकेकडून नोटीस, इमारतीचे पाडकाम थांबवण्याचे आदेश
Three-year-old boy trapped in gallery after window locked
बुलढाणा : आई बाहेर, चिमुकला गॅलरीत ‌‌अन् ‘फ्लॅट’चे दार ‘लॉक’…
kitchen tips hacks how to clean kitchen utensils shiny
Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स
kalyan bar loksatta news
कल्याणमध्ये बारमधील गायिकेला मद्याची बाटली मारण्याचा प्रयत्न; बारमालकाला ग्राहकांची मारहाण, दोन जण अटकेत
Loksatta Lokrang Comfort Food Hapus Mango Market
बारमाही : असले जरी तेच ते…
Loksatta book batmi John Baxter Paris
बुकबातमी: जॉन बॅक्स्टरचे पॅरिस…

हेही वाचा – पाच महिन्याच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या त्रिकुटास अटक; राबोडी पोलिसांनी चार तासात केली बाळाची सुटका

भरत याने थांबून ‘तू माझ्या तोंडावर धूर का सोडला. मी काय तुला केले,’ असे प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी त्या इसमाने भरतला उद्देशून ‘तु मला धक्का मारून जात आहेस. हे तुला कळतय का. मी कोण आहे. तुला माहिती आहे का,’ असे बोलून भरतला पकडून त्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली.

संबंधित इसम हेतुपुरस्सर आपल्याशी वाद घालत आहे हे लक्षात आल्यावर भरत कॅफेमध्ये सुट्टे पैसे देण्यासाठी गेला. दरम्यानच्या काळात संबंधित इसमाने आपल्या आणखी दोन मित्रांना घटनास्थळी तातडीने बोलावून घेतले. कॅफेमधून भरत आपल्या हाॅटेलमध्ये जात असताना तिघांनी भरतला पुन्हा अडविले. त्याला तू काय दादागिरी करतोस का, असे बोलून मारहाण करत भरतच्या डोक्यात जड वस्तूचा फटका मारला. आता आपण कोण आहोत, हे समजले का, असे बोलून ते तिघे तेथून निघून गेले.

हेही वाचा – ठाण्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

भरतने तातडीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. हवालदार एस. पी. कामडी तपास करत आहेत.

Story img Loader