लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील ५० पेक्षा अधिक सदनिका असलेल्या गृहसंकुलांनी अधिकृत पेस्ट कंट्रोल एजन्सी नेमून डास आळीनाशक औषधांची फवारणी करण्याचे परिपत्रक महापालिका प्रशासनाने काढल्यानंतर यास आता गृहनिर्माण संस्थेच्या संघटनेने विरोध केला आहे. परिपत्रकानुसार गृहसंकुलात डासांच्या आळ्या आढळल्यास दंडही भरावा लागणार आहे. महापालिकेच्या या परिपत्रकाचा गृहनिर्माण संस्थेच्या संघटनेने विरोध केला आहे. तसेच महापालिकेच्या कारवाईला देखील सामोरे जाण्याचा तयारी दर्शविली आहे. तसा ठरावच संघटनेने केला. संघटनेच्या या निर्णयास ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. महापालिकेच्या निर्णयामुळे आता वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
Vishal Gawli in custody at Naupada police station thane news
विशाल गवळी नौपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत, रेल्वे मार्गे गाठले होते बुलढाणा
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
Image of Allu Arjun House
Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करणाऱ्या सहा आरोपींना जामीन, हल्लेखोरांशी मुख्यमंत्र्यांचा संबंध असल्याचा आरोप

दि ठाणे ड्रिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन आणि ठाणे जिल्ह्याच्या सहकार विभागाच्या वतीने सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अधिवेशन भरविले होते. यावेळी गृहनिर्माण संस्थांचा पूनर्विकास, समस्या याविषयी संस्थांतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ठाणे महापालिका क्षेत्रात डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेकडून फवारणी केली जाते. महापालिकेने नुकताच एक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, ५० पेक्षा जास्त सदनिका असलेल्या गृहसंकुलांना स्वत:च डास प्रतिबंधक फवारणी करावी लागणार आहे. तसेच डासांच्या आळ्या आढळल्यास दंडही भरावा लागणार आहे. महापालिकेने गृहनिर्माण संकुलांना नोटीसा देखील बजावल्या आहेत.

आणखी वाचा-डोंबिवली : शिळफाटा रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी

या निर्णयास दि ठाणे ड्रिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन या गृहनिर्माण संस्थेच्या संघटनेने विरोध केला. संमेलनामध्ये फेडरेशनचे महापालिकेच्या परिपत्रकाचा विषय निघाला. फवारणीचा खर्च उचलणार नाही. गुन्हा दाखल झाल्यास त्यास आम्ही तयार आहोत. लोकप्रतिनिधींनी हा विषय प्राधान्यांने मांडायला हवा असे ते म्हणाले. यास खासदार नरेश म्हस्के आणि आमदार संजय केळकर यांनीही पाठिंबा दिला. फवारणी करण्यासाठी महापालिका पत्रक काढत असेल तर नागरिकांनी हे पैसे भरू नका असे म्हस्के म्हणाले. असे परिपत्रक महापालिकेने तातडीने रद्द केले पाहिजे. याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. तातडीने हे परिपत्रक रद्द करून घेऊ असेही केळकर म्हणाले.

कचरा, मलनिस्सारण वाहिन्या, रस्ते आम्हीच स्वच्छ करायचे. आता डासांचा प्रतिबंधही आम्ही करायचा, मग महापालिका केवळ दंड लावून कर घेणार का? ठाणे महापालिकेच्या निर्णयाला आमचा पूर्णत: विरोध आहे. -सिताराम राणे, अध्यक्ष, दि ठाणे ड्रिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशन.

आणखी वाचा-शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचे निधन

मुख्यमंत्र्यांचा मोबाईलद्वारे संवाद

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने सात दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. या कार्यक्रमास भाजपचे आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. फडणवीस यांनी दरेकर यांच्या मोबाईलवर संपर्क साधून उपस्थितांशी संवाद साधला. या संमेलनातील निर्णय, अडचणींबाबत मुंबईत बैठक बोलविणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

तक्रारीत ठाणे जिल्हा अग्रेसर

कोकण विभागातील गृहनिर्माण संस्थेच्या तक्रारींपैकी ८० टक्के तक्रारी या ठाणे जिल्ह्यातील असतात. यामध्ये निवडणुक, परिक्षण, विशेष सभा, पूर्नविकास या विषयांवरील तक्रारी अधिक आहेत. कायद्याच्या अभावामुळे या तक्रारी वाढलेल्या दिसून येते. गृहनिर्माण सोसायट्यांमधील पदाधिकारी आणि तक्रारदारांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळेच तक्रारी वाढत असल्याचे सहकार विभागाचे सह-निबंधक मिलिंद भालेराव यांनी सांगितले. जिल्ह्यात ३० हजाराहून अधिक सोसायट्या आहेत त्यापैकी केवळ ५० टक्केच सोसायट्यांचे परिक्षण झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader