भगवान मंडलिक

Dombivli MIDC Blast Latest Updates: डोंबिवलीतल्या एमआयडीसी भागात असलेल्या सोनारपाडा या ठिकाणी एका केमिकल कंपनीत मोठ्ठा स्फोट झाला आहे. त्यानंतर छोट्या स्फोटांचे काही आवाजही ऐकू आले आहेत. या स्फोटांमुळे साधारण तीन ते चार किमीचा परिसर हादरला आहे. डोंबिवली एमआयडीसी भागातल्या नेमक्या कुठल्या कंपनीत हा स्फोट झाला? ही माहिती अद्याप समजू शकलेली नाही. मात्र आगीचे लोळ आणि धुराचे लोट हवेत दिसून येत आहेत. या स्फोटात १५ जण जखमी झाले आहेत.

Cylinder explosion on a handcart in front of Shivajinagar court pune news
शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तीनजण किरकोळ भाजून जखमी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Case registered against two employees of Tinco company in air leak case Badlapur news
वायु गळती प्रकरणी गुन्हा दाखल; टिनको कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा
badlapur east gas spread loksatta news
बदलापूर पूर्वेत पसरला रासायनिक वायू; रहिवाशांना डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास, वायूगळतीचा संशय
Cylinder explosion in Badlapur one injured
Cylinder explosion : बदलापुरात सिलेंडरचा स्फोट, एक जखमी
massive fire breaks out at footwear shops in virar
विरारमध्ये चप्पल दुकानांना भीषण आग; आगीत तीन दुकाने जळून खाक
deadly fight going on between two highly venomous snakes Everyone shuddered to see this scene
व्हिडिओ: अत्यंत विषारी मण्यार सापांची थरकाप उडवणारी झुंज
nagpur bomb threat on email of Hotel Dwarkamai near Ganeshpeth station
“हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, लवकरच स्फोट होणार,” ईमेलवरील धमकीने उपराजधानीत खळबळ…

नेमकी काय घडली घटना?

डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील अंबर केमिकल या कंपनीत मोठ्ठा स्फोट झाला. पाच ते सहा कामगार जखमी झाल्याची भीती व्यक्त होते आहे. डोंबिवली अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

स्फोटानंतर एमआयडीसी परिसरात उडाली राख

स्फोट एवढा मोठा होता की आजूबाजूच्या इमारतींच्या व रस्त्यावर लावलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. एमआयडीसी सागाव साईबाबा मंदिर मागे कंपनीत बॉयलरच स्फोट झाला असून आजूबाजूच्या परिसरामध्ये हवेतून राख पडत आहे. अंबर केमिकल्समध्ये स्फोट झाल्यानंतर रस्त्यावरर मोठ्या प्रमाणावर राख उडाली आहे. तसंच मोठे लोखंडी कणही उडाले आहेत. राख वाहनांवर पडते आहे, तसंच स्फोटांचे आवाज येत आहेत त्यामुळे एमआयडीसी निवासी विभागांतील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

अंबर केमिकल कंपनीच्या परिसरातील अनेक इमारतींच्या घराच्या काचा तावदाने फुटली आहेत.: काही पादचारी राखेने माखले आहेत. काही कुटुंब आपल्याला लहान मुलांसह रस्त्याने चालत होती. यावेळी स्फोट झाल्याने ‘मुले घाबरून मोठ्याने रडू लागली. चालत असताना वरून राखेचा वर्षाव होऊ लागल्याने पादचारी वाहन चालक घाबरले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी स्फोटाबाबत काय म्हटलं आहे?

“एमआयडीसीने या संदर्भात फायर ऑडिट केलं होतं का? हा प्रश्न आहे. कारण महाराष्ट्र सरकारचं हे डिपार्टमेंट फायर ऑडिट करत नाही. दोन वर्षांपूर्वीही स्फोट झाला होता. काय उपाय योजना केल्या आहेत? एमआयडीसीने किती कंपन्याचं फायर ऑडिट केलं आहे? त्याची श्वेतपत्रिका काढावी. एमआयडीसी हे फक्त पैसे खाण्याचं काम करते आहे.” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. टीव्ही ९ शी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

भीषण स्फोटानंतर एमआयडीसीतून बाहेर पडलेल्या एका कामगाराने सांगितलं की, स्फोट झाला ती आमच्या बाजूची कंपनी होती. इतका मोठा स्फोट होता की, आम्ही सगळे बाहेर पडलो. सगळे आगीचे लोळ येत होते. आमच्या हाताला भाजले आहे, असं कामगाराने टीव्ही ९ ला सांगितलं.

काही प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मोठे स्फोट झाले, दोन ते तीन किलोमीटरपर्यंत हादरे जाणवले. अनेकांच्या घरांच्या काचेच्या खिडक्या फुटल्या आहेत. अग्निशमन दलाकडून अतिरिक्त कुमक मागवून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग भीषण असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आतमध्ये जाणे अद्याप शक्य झालेले नाही. अजूनही आग नियंत्रणात आणण्याचे प्रय़त्न सुरु आहेत.

Story img Loader