कल्याण- नागरिकांनी आपल्या हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी पालिकेकडे कराव्यात. ते खड्डे तातडीने बुजविण्याची व्यवस्था प्रशासनातर्फे केली जाईल, असे आवाहन कल्याण डोंबिवली पालिकेने रविवारी केले. पालिका हद्दीतील रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण केली असल्याने गेल्या दोन दिवसात पालिकेतील खड्डे तक्रार कक्षात नागरिकांनी ९० हून अधिक तक्रारी केल्या आहेत, अशी माहिती पालिका मुख्यालयातील खड्डे तक्रार कक्षातील कर्मचाऱ्याने दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोमवारी खड्डे तक्रार कक्ष सुरू झाल्यानंतर डोंबिवली, कल्याण, टिटवाळा भागातील रहिवाशांनी सकाळी साडे वाजल्या नंतर खड्डे तक्रार कक्षात २२०११६८ या हेल्प लाईनवर संपर्क करण्यास सुरुवात केली. ११ वाजेपर्यंत संपर्क कक्षातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेने नागरिकाची दिशाभूल केली आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जात होते.

नक्की वाचा >>Maharashtra News Live : बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळेच मी मुख्यमंत्री झालो- एकनाथ शिंदे

सोमवारी दुपार नंतर खड्डे तक्रार कक्ष सुरू झाला. नागरिकांनी आपल्या भागातील रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारी केल्या. पहिल्या दिवशी ४० तक्रारी कक्षात दाखल झाल्या आहेत. मंगळवारी दुपारपर्यंत ३५ नागरिकांनी खड्ड्यांच्या तक्रारी केल्या होत्या. हा आकडा संध्याकाळपर्यंत वाढेल असे कक्षातील कर्मचाऱ्याने सांगितले.

खड्डे तक्रार कक्षात खड्ड्यांची तक्रार करणाऱ्या नागरिकाचे नाव, मोबाईल क्रमांक लिहून घेतला जातो. त्याने दिलेल्या रस्ते, खड्ड्यांची माहिती नोंदणी वहीत लिहून घेतली जाते. अशी दिवसभराची माहिती संध्याकाळी मुख्यालयातील समन्वयक अभियंता छाननी करतो. ज्या १० प्रभाग हद्दीतील खड्डयांच्या तक्रारी आहेत. त्या भागातील बांधकाम अभियंत्यांकडे त्या तक्रारी वर्ग केल्या जातात. स्थानिक अभियंते ठेकेदाराच्या माध्यमातून तक्रारदाराने सुचविलेले खड्डे बुजविण्याची कामे करतात, असे नियोजन करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

मे अखेरपर्यंत एकही खड्डा, रस्ता सुस्थितीत करण्याचे काम शहर अभियंताकडून करण्यात आले नाही. त्यामुळे पाऊस सुरू होताच बहुतांशी डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. सततच्या वाहन वर्दळीमुळे या खड्ड्यांचे आकार मोठे होत आहेत. त्यामुळे प्रवासी, वाहन चालक हैराण आहेत. या खड्डे तक्रार कक्षाच्या माध्यमातून तरी पालिकेने तातडीने खडडे बुजविण्याची कामे हाती घ्यावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.