डोंबिवली : डोंबिवली येथील मानपाडा रस्त्यावर शनिवारी रात्री भरधाव वेगात असलेल्या एका रिक्षा चालकाने रस्ता ओलांडत असलेल्या पती-पत्नीला जोराची धडक दिली. या धडकेत पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. रात्रीच्या वेळेत अनेक रिक्षा चालक मद्यपान करुन रिक्षा चालवितात. त्यामुळे हे अपघात होत आहेत, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कैलास गुप्ता (५०) आणि त्यांची पत्नी डोंबिवली परिसरात डोक्यावर सामान घेऊन विक्रीचा व्यवसाय करतात. ते घारिवली येथे राहतात. शनिवारी रात्री गुप्ता दाम्पत्याने मानपाडा रस्त्यावरील डी मार्टमध्ये सामान खरेदी केले. ते सामान सायकलवर ठेऊन ते घारिवली येथील घरी जात होते. डी मार्टमधून बाहेर पडल्यानंतर रस्त्याच्या कडेने जात असताना कैलास गुप्ता आणि त्यांच्या पत्नीला डोंबिवली रेल्वे स्थानकाकडून आलेल्या भरधाव वेगात येत असलेल्या एका रिक्षा चालकाने जोराची धडक दिली.

हेही वाचा >>> डोंबिवलीतील आयरे गावातील बेकायदा बांधकामांना नोटिसा; बेकायदा बांधकामे भुईसपाट करण्याचे नियोजन

या धडकेत गुप्ता दाम्पत्य सायकल, सामानासह रस्त्यावर पडले. त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. धडक दिल्यानंतर रिक्षा चालक घटनास्थळावरुन पळून गेला. रात्रीच्या वेळेत इतर पादचारी, वाहन चालकांनी गुप्ता दाम्पत्याला रुग्णालयापर्यंत नेण्यास मदत केली. उपचार घेतल्यानंतर कैलास गुप्ता यांनी रिक्षा चालकाविरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली.