लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: कल्याण-शिळफाटा रस्त्यावर रुणवाल गृहसंकुलाच्या प्रवेशव्दारावर चुकीच्या मार्गिकेतून आलेल्या एका दुचाकी स्वाराने मोटार सायकलवरुन चाललेल्या पती-पत्नीच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात पती-पत्नीला गंभीर दुखापत झाली आहे. दुचाकी स्वार घटनास्थळावरुन पळून गेला.

Biker dies after being hit by PMP bus on nagar road
पुणे : नगर रस्त्यावर पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
Kandalwan damage new jetty, Virar Marambalpada,
नवीन जेट्टीच्या रस्त्यासाठी तिवरांची कत्तल? विरारच्या मारंबळपाडा परिसरातील प्रकार; पर्यावरणप्रेमींकडून संताप
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
young man riding bike died after hitting divider in Yerwada
येरवड्यात दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
buldhana ambulance driver death loksatta news
‘त्याने’ अनेकांचे प्राण वाचविले; पण त्याचा जीव धोक्यात आला तेव्हा….
Accident on Eastern Expressway thane news
पूर्व द्रुतगती महामार्गावर अपघात; चालक जखमी

शिळफाटा रस्त्यावर अनेक दुचाकी स्वार जवळचा मार्ग म्हणून उलट मार्गिकेतून वाहने चालवित आहेत. त्याचा फटका इतर वाहन चालकांना बसत आहे. भोपर येथे राहणाऱ्या सुनंदा फुलानी माळी (५५) पतीच्या दुचाकीवर बसून घारिवली दिशेने जात होत्या. एक अनोळखी दुचाकी स्वार भरधाव वेगाने माळी यांच्या दुचाकीवर येऊन धडकला. दुचाकीवरील माळी दाम्पत्य रस्त्यावर पडले. माळी दाम्पत्याला मदत करण्यासाठी गर्दी झाल्यानंतर अपघात करणारा दुचाकी स्वार घटनास्थळावरुन पळून गेला.

हेही वाचा… डोंबिवली- शिळफाटा रस्त्यावर उलट मार्गिकेतून येणाऱ्या १६७ वाहन चालकांवर कारवाई

एका खासगी रुग्णालयात माळी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. उलट मार्गिकेतून येणारे वाहन चालक हे अपघात करत असल्याने वाहूतक पोलिसांनी अशा चालकांविरुध्द कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी सुनंदा माळी यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Story img Loader