कल्याण – युक्रेनमधील एका महिलेसोबत पतीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दहा दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणी तिच्या पतीला कोळसेवाडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. नितीश नायर असे अटक आरोपी पतीचे नाव आहे. तो कल्याण येथील काटेमानिवली परिसरात राहतो. तो एका शिपिंग कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. काजल असे आत्महत्या केलेल्या महिलेचा नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काजलचे वडील सुरेंद्र सावंत यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीश आणि काजल या दोघांचा प्रेमविवाह तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. सप्टेंबर महिन्यात काजल हिला माहिती मिळाली की, नितीशचे युक्रेनमधील एका महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. या प्रेमाला काजल आणि कुटुंबीयांनी विरोध केला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा