कल्याण : पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा आहे. यासाठी तू माहेरहून १५ लाख रूपये घेऊन ये, नाहीतर तू घरात येऊ नकोस, असे बोलून दुसऱ्या पत्नीला जीवे ठार मारण्याची धमकी पतीने दिली. पत्नीने पतीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण पतीने मला तुझ्याशी काहीही बोलायचे नाही. तू माझ्या घरातून निघून जा, असे सांगून दुसऱ्या पत्नीला तलाक तलाक तलाक बोलून तिच्या बरोबर घटस्फोट घेऊन तिला घराबाहेर हाकलून दिले. कल्याण पश्चिमेतील एका उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार जुलैपासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या काळात घडला आहे.
२८ वर्षाची पीडित पत्नी ही गृहिणी आहे. ४५ वर्षाचा पती संगणक अभियंता आहे. या पती पत्नीचा विवाह गेल्या जानेवारीत झाला होता. पीडित पत्नी ही छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे. पती हा कल्याणमध्ये एका उच्चभ्रू सोसायटीत राहतो. विवाहानंतर दुसऱ्या पत्नीला आपल्या पतीचा पहिला विवाह झाले असल्याचे समजले. सुरुवातीचे काही दिवस दुसऱ्या पत्नीने या प्रकरणाकडे सुखी संसाराचा विचार करून दुर्लक्ष केले. जुलैपासून उच्च शिक्षित पतीने दुसऱ्या पत्नीकडे आपणास पहिल्या पत्नीपासून तलाक घ्यायचा आहे. यासाठी आपणास १५ लाख रूपयांची गरज आहे. ते पैसे तू माहेरहून आण, असा तगादा लावला. विविध कारणे पुढे करून पती आपल्या दुसऱ्या पत्नीला त्रास देऊ लागला. पतीच्या काही मागण्या पीडित पत्नी पूर्ण करत नव्हती. त्याचा राग पतीला येत होता. त्या रागातून तो पत्नीला मारहाण करत होता.
हेही वाचा…ठाण्यातील ९३ हेक्टर कांदळवनाचा नाश; सरकारच्या ‘वन सर्वेक्षण अहवाला’तून धक्कादायक माहिती उजेडात
माहेरहून १५ लाख रूपये आण नाहीतर तू माझ्या घरात येऊ नकोस, असे बोलून पतीने पत्नीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ५ डिसेंबर रोजी पीडित पत्नी आपल्या पतीच्या घरी येऊन मला तुमच्या बरोबर काही बोलायचे असे म्हणाली. त्यावेळी पतीने मला तुझ्या बरोबर काही बोलायचे नाही. तु माझ्या घरातून निघून जा, असे बोलत दुसऱ्या पत्नीला मारहाण करत तिला घरातून बाहेर काढले. तिला तलाक तलाक तलाक बोलत घटस्फोट घेतला.
हेही वाचा…VIDEO : रेल्वे आणि फलाटाच्या पोकळीत सापडलेल्या प्रवाशाला आरपीएफच्या कर्मचाऱ्यांकडून जीवदान
पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित पत्नी कल्याण येथून आपल्या माहेरी छत्रपती संभाजीनगर येथे आली. पतीच्या कृत्या विरुध्द तिने संभाजीनगर येथील जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार केली. गु्न्हा कल्याण येथे बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत घडला. तो गुन्हा बाजारपेठ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. बाजारपेठ पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या मुस्लिम महिला विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण कायदा, विवाहितेला क्रूर वागणूक आणि अवैध पध्दतीने तलाक देणे कायद्याने पीडितेच्या तक्रारीवरून पती विरुध्द गु्न्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक रमेश गाडवे तपास करत आहेत.