“राज्य सरकारमध्ये मनसेला मंत्रिपद देण्याची हालचाल सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. यापुर्वीच्या निवडणुकांमध्ये मनसे हा भाजपा, रिपब्लिकन पक्षासोबत कधीच नव्हता. त्यामुळे मनसेला मंत्रिपद देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अशाही परिस्थितीत मनसेला मंत्रिपद देण्यात येत असेल तर आमचा त्याला विरोध असेल.”, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी कल्याण स्पष्ट केली.
एका कार्यक्रमासाठी मंत्री आठवले कल्याणमध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील शिवसेना-भाजपा युतीचे सरकार म्हणजे शिंदे सरकार आहे. या सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) एक मंत्रिपद मिळेल. तसेच महामंडळ अध्यक्ष पद वाटपातही पक्षाला स्थान मिळेल, असा विश्वास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.

Maharashtra Political Crisis Live : नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ

Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
What Nana Patole Said About Devendra Fadnavis ?
Nana Patole : “देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री कसे होतील? ते निवडून येणारच नाहीत..”; नाना पटोले काय म्हणाले?

तसेच, आतापर्यंत सर्व निवडणुका रिपब्लिकन आठवले गटाने शिवसेना-भाजपा युतीत राहून लढविल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेपासून फारकत घेऊन वेगळा गट तयार केला आहे. आता राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे. अगोदरच्या सगळ्या प्रक्रियेत मनसेचा कधीही सहभाग नव्हता. त्यामुळे मनसेला मंत्रिपद देण्याचा प्रश्नच येत नाही, असे आठवले यांनी सांगितले.

सरकार स्थापनेतील मनसेचा महत्वपूर्ण सहभाग –

“ राज्यसभा, विधानसभा निवडणूक आणि राज्यात शिंदे सरकार स्थापन होण्यात मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून महत्वपूर्ण भूमिका बजावली. राज्यात शिंदे यांच्या सोबत भाजपाने सत्ता स्थापनेचा निर्णय घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला संपर्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केला. राज ठाकरे यांनी होकार दर्शविताच सत्ता स्थापनेच्या पुढील हालचालींना अधिक वेग आला. राज ठाकरे यांनी तिन्ही वेळा विनाअट पाठिंबा दिला आहे. शिंदे सरकारने मनसेला मंत्रिपद द्यावे अशी कोणतीही अट मनसेने सरकारला घातली नाही. परंतु, सरकार स्थापनेतील मनसेचा महत्वपूर्ण सहभाग याचा विचार सरकारकडून निश्चित केला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही जाणीव असल्याने नक्कीच मनसेला मंत्रिपद मिळेल.”, असे मनसेच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.