लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधी मुंब्रा शहरात आले नाहीत. त्यामुळे त्यांना मुंब्रा शहराची रचना माहीत नाही. या शहराच्या वेशीवर असलेल्या शिल्पात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी जागेची परवानगी दिली, निधी दिला तर तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी मुंब्रा शहरात महाराजांचा पुतळा बांधून दाखवतो असे आव्हान राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. तसेच या पुतळ्याचे लोकार्पण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करून दाखविणार असल्याचेही ते म्हणाले.

Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Ashish Shelar Raj Thackeray
Ashish Shelar : अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, कंबर कसून प्रचार करण्याचे आदेश
sharad pawar retirement (1)
Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, आता राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मुंब्रा शहरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून दाखवा असे आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिले होते. त्यास जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्याच्या निवडणुक रिंगणात जुनेच चेहरे

मी कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्त्व करतो. जिथे ५० टक्के मुस्लिम आणि ५० टक्के हिंदू आहेत. मुंब्रा शहराला विनाकारण बदनाम करु नका, मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या बाजूला सुंदर मंदिर बांधून दिले आहे. मुंब्रा शहरात मुंब्रा देवी मंदीर आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जागेची परवानगी दिली, निधी दिला तर तुम्ही म्हणाल, त्या ठिकाणी मुंब्रा शहरात पुतळा बांधून दाखवतो असे आव्हाड म्हणाले.

लाल रंगाचा अर्थ प्रेम , हृदय , क्रांतीचा रंग लाल आहे असे ते म्हणाले. आमचे रक्त सळसळत आहे कारण तुम्ही संविधान बदलणार म्हणून या संविधानाचा रंग लाल आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. हृदयाचा रंग लाल आहे त्याचा काय नक्षलवाद्यांशी संबंध आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली.

Story img Loader