ठाणे : मेट्रो प्रकल्पासह इतर प्रकल्पांची कामे महाविकास आघाडीने बाळ हट्टामुळे बंद पडली होती आणि त्यांनी चौकशीची मागणी केली होती. पण मी चौकशी लावली नाही. जर मी चौकशी लावली असती तर आज मेट्रो प्रकल्प सुरू झाला नसता, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना केला. मोदी हे विकास आणि विश्वासाचे रूप असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पांचे भूमिपूजन झाले की तो प्रकल्प पूर्णत्वास येतो, याची गॅरंटी मिळते. तसेच प्रकल्पाचे भूमिपूजन करणे आणि त्याचे लोकार्पण करणे, असा योग पंतप्रधान मोदी यांना लाभलेला आहे. असे भाग्य कमी लोकांना मिळते, असेही शिंदे म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मुंबईत सर्वात मोठा विकास होत आहे, तसेच ठाणे हे विकासाचे खणखणीत नाणे असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Shinde Fadnavis move by transferring Gadchiroli District Collector Gadchiroli news
गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून शिंदेना फडणवीसांचा शह?
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Deputy Chief Minister Eknath Shinde on a tour of Dare village
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे दौऱ्यावर
Will Deputy Chief Minister Eknath Shinde succeed in retaining post of Guardian Minister of Thane
अजित पवारांचा कित्ता एकनाथ शिंदे गिरवणार का?
Eknath Shinde
“…तर त्यांना चोप दिला जाईल”, कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणावर शिंदेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
How harmful is the destruction of the cypress forests on the Vasai and Palghar coasts for the environment
वसई, पालघर किनाऱ्यावरील सुरूची वनराई नष्ट होणे पर्यावरणासाठी किती हानीकारक?
Eknath Shinde
नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंकडून श्रद्धा अन् सबुरीचा सल्ला; म्हणाले, “दुसऱ्या टप्प्यात…”
devendra fadanvis
महायुतीच्या आमदारांची रेशीमबागेतील स्मृती मंदिराला भेट

हेही वाचा – विकासशत्रू महाविकास आघाडीला रोखा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाविकास आघाडीचा अडीच वर्षांचा आणि आमच्या सव्वादोन वर्षांचा हिशोब मांडा, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल असे त्यांनी म्हटले. आज मुंबई, ठाणे नाहीतर अख्खा महाराष्ट्र कात टाकत आहे. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर लोकांच्या हिताची कामे केली. ही कामे करताना पंचोलीटी, रिलायबिलिटी आणि स्टॅबिलिटी तीन गोष्टींची काळजी घेतली. त्यामुळे आमचे सरकार आता लाडके सरकार झाले आहे. तसेच महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात नंबर एकवर आहे. याचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. करोना रुग्णांची खिचडी खाणारे आम्ही नाही. तर आम्ही जनतेचे अश्रू पुसणारे आहोत. विरोधक आरोप आणि शिव्या शाप देत आहेत पण त्यांना आम्ही आरोपातून नाहीतर कामातून उत्तर देऊ असेही त्यांनी सांगितले. तसेच मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आहे. त्याबद्दल मोदी यांचे आभार मानतो, असेही ते म्हणाले. मोदी हे विकास पर्व आणि विश्वनेता आहेत. ते भारताला विश्वगुरू करण्याचे स्वप्न ते पाहत आहेत. त्यासाठी ते गती आणि प्रगती याविषयी नेहमी बोलत असतात. तसेच ‘मोदीजी आपके नेतृत्व मे शिखर पर है राज्य, देश का गौरव बढाने के लिए सदा खडा रहेगा महाराष्ट्र’, असेही उद्गार शिंदे यांनी यावेळी काढले.

हेही वाचा – शहाड उड्डाणपुलाची कोंडी फुटणार, एमएमआरडीएकडून निविदा जाहीर, चारपदरी उड्डाणपूल होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तिसरी इनिंगची दमदार सुरुवात झाली आहे. मोदी सरकारला १०० दिवस झाले असून त्यांनी विकासाचे शतक पूर्ण केले आहे. त्यामध्ये आम्ही एक घटक आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे.  मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा अभिमानास्पद निर्णय घेतला असून त्यांचे जनतेच्यावतीने आभार मानतो. मोदी यांनी विकासाची पायाभरणी केल्याने देश मजबूत झाला आहे. मोदी यांच्या विकासकामांमुळे जगात पुढील दहा वर्षे हे भारताचे असणार आहेत. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याची दमदार वाटचाल सुरू आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Story img Loader