बेकायदा पार्किंग, फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांची अडथळा शर्यत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ठाणे : वाहनकोंडी आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना नकोशा झालेल्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरात बेकायदा पद्धतीने दुचाकी उभ्या केल्या जात आहेत. पोलीस व काही राजकीय पक्षांचे निशाण या वाहनांवर चिकटवून हे अतिक्रमण सुरू आहे.

रेल्वे स्थानक परिसरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलीस आणि महापालिकेच्या पुढाकाराने रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्यासाठी ठरावीक वेळा ठरवून देण्यात आल्या होत्या. या नियमाची अंमलबजावणी व्हावी यासाठी महापालिकेकडून स्थानक परिसर, गावदेवी या भागात वाहनतळ उभारण्यात आले. तरीही रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून या प्रकारांमध्ये वाढ झाली असून या भागात कोणाचेही नियंत्रण राहिले नसल्याचे चित्र आहे. जुन्या वाहतूक शाखेच्या ठिकाणी नागरिक सकाळपासून दुचाकी उभी करून निघून जातात. काही वेळा या दुचाकींवर स्थानिक वाहतूक शाखेकडून कारवाई होत असली तरी ज्या दुचाकींवर पोलीस विभागाची तसेच राजकीय पक्षांची चिन्हे आहेत, अशा दुचाकींवर कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. काही वाहनचालक हे आम्ही अमुक स्थानिक नगरसेवकाचे कार्यकर्ते आहोत तसेच मी पोलीस विभागात अमुक पदावर कार्यरत आहे अशा बतावण्या करत वाहने पार्क करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

ठाणे स्थानकातून फलाट क्रमांक एक येथून स्थानकाच्या बाहेरून दादा पाटील वाडीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठय़ा प्रमाणावर दुचाकी उभ्या करण्यात येतात. परिणामी नागरिकांना वळसा घालून पुढे जावे लागते. स्थानकाच्या बाहेरील बाजूस पालिकेकडून प्रशस्त वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असताना निव्वळ पैसे वाचवण्यासाठी वाहनचालक दुचाकी उभी करत असल्याचे सांगितले जात आहे. या दुचाकींचा आधार घेऊन काही खाद्यविक्रेते ठाण मांडून बसतात. त्यामुळे प्रवाशांच्या वाटेत अडथळे येत आहेत.

टोइंग व्हॅनची ठेकेदारी १५ दिवसांपूर्वी समाप्त झाली होती. मात्र आता निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या काळात ठाणे स्थानकाबाहेरील दुचाकींवर कारवाई करण्यात आली नव्हती. अवैद्यपणे उभ्या राहणाऱ्या दुचाकींवर कारवाई करण्यात येईल.

– सुरेश लंभाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे नगर वाहतूक शाखा