कल्याण– बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकळी गावात गावाबाहेरील नैसर्गिक स्त्रोत बंद करुन सरकारी जमिनीवर भूमाफियांनी बेकायदा इमारत उभारली होती. या इमारतीच्या तक्रारी प्राप्त होताच आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी शक्तिमान यंत्राच्या साहाय्याने ही इमारत भुईसपाट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> डोंबिवलीतील सेवानिवृत्ताची ७७ लाखाची फसवणूक

आडिवली ढोकळी गावात भूमाफियांनी गावा बाहेरील मोकळ्या सरकारी जमिनीवर, नैसर्गिक स्त्रोत बंद करुन चार माळ्याची बेकायदा इमारत उभारली आहे. या इमारतीमधील ६० ते ७० सदनिका, व्यापारी गाळे माफिया विकण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांना मिळाली. त्यांनी प्रत्यक्ष इमारतीची पाहणी केली. त्यावेळी ही इमारत बांधताना पालिकेची कोणतीही परवानगी घेतली नाही. गावातील सांडपाणी वाहून नेण्याचे स्त्रोत या इमारतीमुळे बंद झाले आहेत. या इमारतीमुळे आडिवली, ढोकळी परिसरात पावसाळ्यात पाणी तुंबत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले.

हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीत रस्त्यावरील धूळ नियंत्रणासाठी पालिकेकडून लवकरच दोन सयंत्र

या इमारतीच्या माफियांना जमीन मालकी, बांधकामाची कागदपत्रे सादर करण्याची नोटीस साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी बजावली. त्याला माफियांनी उत्तर दिले नाही. आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त स्वाती कुलकर्णी यांच्या आदेशावरुन साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी शुक्रवारी दिवसभरात आय प्रभागातील तोडकाम पथकाच्या साहाय्याने ही इमारत भुईसपाट केली. घण, हातोड्यांनी इमारत तोडण्यास विलंब होत असल्याने आयुक्त दांगडे यांनी हाय जा क्रॅकर यंत्र घटनास्थळी तातडीने पाठविले. या शक्तिमान यंत्राच्या साहाय्याने इमारत भुईसपाट केली. इमारत तोडकाम पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मागील अनेक महिन्यांपासून बेकायदा बांधकामांवर आक्रमक कारवाई करणाऱ्या साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी पावसाळ्यातही बेकायदा चाळी, गाळे, इमारती तोडण्याची मोहीम सुरूच ठेवल्याने आयुक्तांनी समाधान व्यक्त केले. टिटवाळा अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे यांच्या कामगिरीबद्दलही आयुक्तांनी समाधान व्यक्त केले आहे.