डोंबिवली- येथील पूर्व भागातील आयरे गाव परिसरातील चाळींमध्ये दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे पाणी शिरले आहे. दोन दिवसांपासून घरातील पाणी उपसून रहिवासी हैराण झाले आहेत. आयरे भागातून खाडीकडे जाणारे नाले, गटारे, ओहळ भूमाफियांनी बेकायदा चाळी बांधून बंद केल्याने त्याचा फटका रहिवाशांना बसण्यास सुरुवात झाली आहे.दोन दिवसाच्या किरकोळ पावसामध्ये आयरे गाव भागातील चाळी जलमय होऊ लागल्याने मुसळधार पावसाच्या काळात या चाळींमध्ये एक ते दोन फूट पाणी शिरण्याची शक्यता रहिवाशांनी व्यक्त केली. आयरे गावातील शांताबाई चाळ चारही बाजुने पावसाच्या पाण्याने वेढली आहे. रहिवाशांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे.

घरात लहान बाळे, वृध्द, शाळकरी मुले आहेत. त्यांचे घरातील पाण्याने सर्वाधिक हाल झाले.आयरे गाव परिसरात सागरी किनारा नियमन क्षेत्र, हरितपट्टाचा मोठा भाग आहे. या पट्ट्यावर गेल्या १० वर्षाच्या काळात पाच हजाराहून अधिक बेकायदा चाळी बांधण्यात आल्या आहेत. पालिकेचे विकास आराखड्यातील रस्ते बांधकामामध्ये बंद करण्यात आले आहेत. नांदिवली, सागाव, भोपर, एमआयडीसी भागातून येऊन उल्हास खाडीकडे जाणारे आयरे भागातील बहुतांशी नाले, गटारे माफियांनी चाळी, इमारती बांधून बंद केली आहेत.

Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम
Loksatta shaharbat Vasai suffers from heavy dust pollution
शहरबात: धूळ प्रदूषणाने वसईची घुसमट …
Building catches fire in Thane residents escape safely
ठाण्यात इमारतीला आग, रहिवाशांची सुखरूप सुटका
Hair loss and baldness cases reported in 11 Shegaon villages unsafe water found in Matargaon
टक्कलग्रस्त माटरगावमधील पाणी अपायकारक! ‘नायट्रेट’चे जास्त प्रमाण
rain of money through superstition and witchcraft in patur forest
अंधश्रद्धा व जादूटोण्यातून पैशांचा कथित पाऊस… पातूरच्या जंगलात नेमकं घडलं काय?

हेही वाचा >>>सत्ताधाऱ्यांमुळे मुंबई पालिकेचे पैसे वाचविण्याबरोबरच अपघात टळले असते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

आता आयरे गावातील तलाव बुजवून तेथे चाळी बांधण्याचे काम भूमाफियांनी सुरू केले आहे. आयरे गाव परिसरात १४ बेकायदा टोलेजंग इमारती उभ्या आहेत. तत्कालीन साहाय्यक आयुक्त संजय साबळे यांनी या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागविला आहे अशी कारणे देऊन या बेकायदा बांधकामांवर कारवाई केली नसल्याचे आयरेतील तक्रारदारांनी सांगितले.या बेकायदा बांधकामांवर पालिकेचे कोणतेही नियंत्रण नसल्याने गरजेपोटी या बेकायदा चाळींमध्ये घरे घेणाऱ्या नागरिकांची माफियांकडून फसवणूक होत आहे. अपुरा पाणी पुरवठा, चोरुन वीज पुरवठा आणि पावसाळ्यात पावसाचे पाणी घरात अशा समस्यांना या भागातील रहिवाशांना सामोरे जावे लागते.

हेही वाचा >>>भातसा नदीपात्रात एकाचा बुडून मृत्यू

आयरे गावातील शांताबाई निवास चाळीच्या दोन्ही बाजुला उंचवटे रस्ते आहेत. उतरावरुन येणारे पाणी थेट या चाळींमध्ये घुसते. या चाळींच्या भागातूनबाहेर जाण्यासाटी पाण्याला मार्ग नसल्याने ते चाळींच्या भागात तुंबून राहते, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.या भागातील रहिवाशांनी तुबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी सहकार्य करावे म्हणून पालिका अधिकाऱ्यांना पत्रे दिली आहेत. उलट अधिकारी आम्हाला घरे खाली करा म्हणून सूचना करतात, असे रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.

Story img Loader