वनवासी कल्याण आश्रमाच्या नावाने बनावट देणगी पावत्या तयार करुन एक तरुणी लोकांकडून पैसे घेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वनवासी कल्याण आश्रम गेली ७० वर्ष आदिवासी सेवा कार्यात समर्पित भावाने कार्यरत आहे.
हेही वाचा- ठाणे : दुचाकी चालकाला वाचवण्याच्या नादात ट्रकचा अपघात; दोघांचा मृत्यू
वनवासी कल्याण आश्रमाच्या एका जागरुक कार्यकर्त्याच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर हा बेकायदा देणगी वसुलीचा प्रकार उघडकीला आला आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा या भागांसह राज्याच्या दुर्गम, आदिवासी भागात वनवासी कल्याण आश्रमातर्फे आदिवासी समाजाचा उत्कर्ष, शिक्षण, जागरुकता याविषयी सर्मपित भावाने काम सुरू आहे. डहाणू, तलासरी भागात वनवासी कल्याण आश्रमाच्या शाळांमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भाजप, संघ परिवारातील अनेक कार्यकर्ते नोकरी, व्यवसाय सांभाळून वनवासी कल्याण आश्रमाच्या कामात सक्रिय आहेत. वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते आदिवासी भागातील सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, रोजगाराचे उपक्रम यशस्वी करत आहेत.
हेही वाचा- डोंबिवलीत धावत्या मोटीराला आग
शहरी भागातील अनेक नोकरदार, व्यावसायिक आदिवासी समाजाच्या विकासासाठी आपलेही योगदान म्हणून नियमित वनवासी कल्याण आश्रमाला आपल्या इच्छेने आर्थिक साहाय्य करत असतात. हे सगळे व्यवहार धनादेशाच्या माध्यमातून केले जातात. गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीत वनवासी कल्याण आश्रमाच्या नावाने रोख रकमेतून देणग्या वसूल केल्या जात असल्याची कुणकुण सुरू होती. वनवासी कल्याण आश्रमाला नियमित अर्थसाहाय्य करणाऱ्या डोंबिवली पूर्वतील दत्तनगर मधील एका मध्यमवर्गीय कुटुंबीयांच्या घरी एक तरुणी गेली. तिने वनवासी कल्याण आश्रमाची कार्यकर्ती आहे, असे सांगून संबंधित कुटुंबियाच्या घरात प्रवेश मिळविला. वनवासी कल्याण आश्रमाच्या बनावट पावती पुस्तकातील ठरावीक रकमेची पावती तरुणीने तयार करुन ती देणगीदाराच्या हातात दिली. वनवासी कल्याण आश्रमाकडून मिळणाऱ्या पावती सारखीच बनावट पावती असल्याने देणगीदाराच्या लक्षात आले नाही.
हेही वाचा- पोलिसांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी चोरट्याचे बेशुध्दीचे ढोंग ; कल्याणमधील रहेजा संकुलातील प्रकार
देणगी साहाय्य करणारे गृहस्थ हे नियमित धनादेशाने वनवासी कल्याण आश्रमाला साहाय्य करत होते. आश्रमाकडून व्यवहारातील चोखपणा राखण्यासाठी धनादेशाव्दारे देणग्या स्वीकारते. हे देणगी साहाय्य करणाऱ्या रहिवाशाला माहिती होते. बनावट पावती हातावर ठेऊन रोख रक्कम घेऊन तरुणी घरातून निघून गेली. देणगी साहाय्य करणाऱ्या रहिवाशाने उत्सुकता म्हणून आपल्या वनवासी कल्याण आश्रमाशी संबंधित मित्राला संपर्क करुन वनवासी कल्याण आश्रमाला आज देणगी दिली. परंतु, ही देणगी धनादेशाव्दारे न घेता रोख स्वरुपात घेण्यात आली आहे असे सांगितले. त्यावेळी आश्रमाशी संबंधित एका कार्यकर्त्याने चौकशी करुन अशी कोणत्याही प्रकारची देणगी घेण्यासाठी डोंबिवलीत कोणीही फिरत नाही. रोख रक्कम तर आश्रमातर्फे स्वीकारली जात नाही असे सांगितले. देणगी साहाय्य करणाऱ्या रहिवाशाने आपल्या मित्राला वनवासी कल्याण आश्रमाची तरुणीने दिलेली पावती व्हाॅट्सपवर पाठवली. त्यावेळी ती पावती बनावट असल्याचे आढळून आले.
हेही वाचा- Open Letter: मुलीची छेड काढणारे रिक्षावाले काका, स्तन सगळ्याच मुलींकडे असतात पण…
वनवासी कल्याण आश्रमाचे महाराष्ट्र प्रांत सचिव महेश देशपांडे यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. त्यांनीही अशाप्रकारची देणगी वसुली आश्रमाकडून केली जात नसल्याची माहिती डोंबिवलीतील कार्यकर्त्यांना दिली. वनवासी कल्याण आश्रमाच्या नावे काही तोतया व्यक्ति बनावट पावत्यांचा आधार घेऊन देणगी वसुली करत असल्याचे निदर्शनास आल्यावर ज्या देगणी साहाय्य व्यक्तिच्या घरातून तरुणीने देणगी घेतली होती. त्या दत्तनगर घर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले. त्या तरुणीची कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली छबी पाहण्यात आली. २५ ते ३० वयोगटातील तरुणी हा प्रकार करत असल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले. कार्यकर्त्यांनी ही माहिती रामनगर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या तरुणीचा शोध सुरू केला आहे.
हेही वाचा- पोलिसांनी जप्त केलेल्या सदनिकांची विक्री; ठाणे महापालिकेच्या तत्कालीन साहाय्यक आयुक्तासह पाचजणांविरोधात गुन्हा
वनवासी कल्याण आश्रमाकडून कोणतेही निधी संकलन केले जात नाही. आश्रमाच्या नावे देणगी मागण्यासाठी कोणी व्यक्ति घरी, कार्यालयात आली तर तात्काळ ७०२१९०५८२३ या क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती वनवासी कल्याण आश्रमचे महाराष्ट्र प्रांत सचिव महेश देशपांडे यांनी दिली