डोंबिवली: डोंबिवली जवळील आयरे गाव, कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळील ४४ एकरच्या हरीतपट्ट्यावर उभारण्यात आलेल्या दोन ते तीन हजार बेकायदा चाळी आणि नव्याने बांधण्यात आलेल्या १४ बेकायदा इमारतींना सुमारे ८०० हून बेकायदा नळजोडण्यांमधून पाणी पुरवठा केला जात आहे. पालिकेच्या मुख्य जलवाहिन्यांना छिद्र पाडून ही पाणी चोरी केली जात आहे. तसेच, या बेकायदा बांधकामांना बेकायदा वीज पुरवठा केला जात असल्याची माहिती उजेडात आली आहे.

या बेकायदा बांधकामांमध्ये कल्याण डोंबिवली पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांचा सहभाग असल्याने या भागाला पाणी पुरवठा, वीज पुरवठा होण्यात कोणतीही अडचण येत नाही, असे आयरे गाव भागातील एका सुत्राने सांगितले. पालिकेतील एका कामगाराच्या सहा सदनिका या भागातील बेकायदा इमारतीमध्ये असून हा पालिका कामगार अधिकारी आणि भूमाफिया यांचा समन्वयक म्हणून काम करतो, अशी माहिती सुत्रांनी दिली. कोपर पूर्व रेल्वे स्थानका जवळील बेकायदा चाळींना कोपर पश्चिम भागातून रेल्वे रुळावरील नाल्याखालून जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. पालिका पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी, प्लम्बर मुख्य जलवाहिनी छिद्र पाडून बेकायदा चाळी, इमारतींना नळजोडण्या देतात, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले. तीन ते चार इंचाची नळजोडणी घेण्यासाठी एक खोलीमागे सात हजार रुपये वसूल केले जातात. या पाणी पुरवठ्यातून पालिकेला एक पैशाचा महसूल मिळत नाही. परिसरातील अधिकृत इमारतीत राहणारे रहिवासी याविषयी नाराजी व्यक्त करत आहेत.

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका
Sale of Jagannath Baba Sansthans land without permission Former MLAs allege against Mahavikas Aghadi candidate
वणी येथील जगन्नाथबाबा संस्थानची जमीन विनापरवानगी विक्री; महाविकास आघाडीच्या उमेदवारावर माजी आमदारांचा आरोप
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?

हेही वाचा >>> डोंबिवलीतील आयरे गाव, कोपर पूर्व मधील ४४ एकरचा हरितपट्टा बेकायदा बांधकामांच्या विळख्यात

महावितरणचा वीज पुरवठा

आयरे, कोपर पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील ४४ एकरचा पट्टा (एक लाख ७५ हजार चौरस मीटर) हरित पट्टा, सी.आर.झेड क्षेत्र असताना महावितरणचे अधिकारी या भागात बेकायदा चाळी, इमारतींना वीजपुरवठा देताना जमीन कागदपत्रांची शहानिशा करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशाच पध्दतीने कुंभारखाणपाडा येथे वीज पुरवठा करण्यात आला आहे. बेकायदा इमारतीमधील सदनिकेला वीज मीटर देण्यासाठी मध्यस्थ २० हजार रुपये, चाळीत वीज मीटर बसविण्यासाठी आठ हजार रुपये घेऊन वीज पुरवठा केला जातो, अशी माहिती सुत्रांनी दिली. महावितरण अधिकाऱ्याने मात्र हे प्रकरण तपासून मगच बोलावे लागेल असे सांगितले. राजकीय दबावामुळे जलवाहिन्या, वीज पुरवठा द्यावा लागतो, असे एका अधिकाऱ्याने खासगीत सांगितले.

‘कागदपत्र तपासून बांधकामांना वीज पुरवठा केला जातो. काही बांधकामांसंदर्भात संशय असेल तर त्याची खात्री पालिकेकडून केली जाते. त्याशिवाय बांधकामांना वीज पुरवठा दिला जात नाही. आयरे, कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागात कोणत्या पध्दतीने वीज पुरवठा दिला गेला आहे हे तपासून पहावे लागेल,’ असे महावितरणच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.