लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथे गोपीनाथ चौकाजवळ एका ढाब्याच्या जागेवर भर नागरी वस्तीत शुक्रवार ते रविवार या कालावधीत जमीन मालकाने कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता एका बेकायदा चाळीची उभारणी केली आहे. ही बेकायदा चाळ भर नागरी वस्ती असल्याने या चाळीवर कारवाई करावी म्हणून स्थानिक राजकीय मंडळींसह नागरिकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत.

Kumbh stampede 1952
Mahakumbh Stampede: एका हत्तीमुळे कुंभमेळ्यात गेले होते ५०० भाविकांचे प्राण; पंडित जवाहरलाल नेहरुंवर झाले आरोप
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Prayagraj Stampede
Mahakumbh Stampede: महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीनंतर पंतप्रधान मोदींचा तीन वेळा योगी आदित्यनाथांना फोन, नेमकी चर्चा काय झाली?
Clean up marshal recovery of penalty outside Dadar railway station Mumbai Municipal Corporation action video viral
दादर रेल्वेस्थानकाबाहेर ‘या’ लोकांकडून केली जातेय दंड वसुली; मुंबई पालिकेच्या कारवाईची ही कोणती पद्धत? VIDEO VIRAL
Protesters demand that Vishalgad should be cleared of encroachments and dargah should be removed
विशाळगड अतिक्रमणमुक्त करत दर्गा हटवा; आंदोलकांची मागणी
Nalasopara unauthorised building vasai virar municipal corporation
नालासोपाऱ्यातील अनधिकृत इमारतीवर कारवाईला सुरुवात, रहिवाशांचा आक्रोश
Construction of large water channels begins in Gorai Mumbai news
गोराईमध्ये मोठ्या जलवाहिन्या टाकण्यास सुरुवात; काही गावांमध्ये पालिकेच्या कामाला विरोध
pune puzzle
“लहान पाखरू अन् ढेरी मोठी…”, ओळखा पाहू मी कोण? फक्त खऱ्या पुणेकरांना माहित असेल उत्तर!

कल्याण डोंबिवली पालिकेला शनिवार, रविवारी सुट्टी असते. त्याचा गैरफायदा घेत पालिकेच्या ह प्रभाग हद्दीत देवीचापाडा येथील गोपीनाथ चौकाजवळ धवनी इमारत आणि जय मल्हार सर्व्हिस सेंटरच्या बाजुला मोबाईल मनोऱ्याजवळ हे बेकायदा चाळीचे बांधकाम करण्यात आले आहे. अनेक वर्ष मोकळ्या असलेल्या जागेवर दोन दिवसांच्या कालावधीत बेकायदा चाळीची उभारणी करण्यात आल्याने परिसरातील नागरिक हैराण आहेत. स्थानिक राजकीय मंडळींनी याविषयी ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.

आणखी वाचा-सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि क्रीडा विश्वातला प्रधान हरपला- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चाळीचे हे बेकायदा बांधकाम कोणालाही दिसू नये म्हणून या बांधकामाच्या रस्त्याकडील बाजुला पडदे लावण्यात आले होते. बेकायदा चाळ उभारलेल्या ठिकाणी यापूर्वी एक ढाबा होता. तो ढोबा काही महिन्यापूर्वी ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी जमीनदोस्त केला होता. आता या मोकळ्या जागेवर बेकायदा चाळीची उभारणी करण्यात आली आहे. परिसरातील पावसाचे पाणी पावसाळ्यात या चाळीच्या ठिकाणी अडून या भागात पाणी तुंबण्याचे प्रकार होतील, अशी भीती स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली.

राजकीय दबाव

या बेकायदा चाळीची एका स्थानिक राजकीय व्यक्तिने पालिकेच्या ह प्रभाग अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. ही तक्रार प्राप्त होताच शुक्रवारी साहाय्यक आयुक्त सावंत यांनी बेकायदा चाळीची पाहणी केली. या पाहणीनंतर नेहमीच बेकायदा बांधकामे वाचविण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणणाऱ्या राजकीय मंडळींनी, एका लोकप्रतिनिधीने साहाय्यक आयुक्त सावंत यांना संपर्क करून, बांधकामधारक आपल्या पक्षाचा माणूस आहे. त्यांच्या बांधकामावर कारवाई करू नका, असे सांगितले. पालिका हद्दीतील नवीन बेकायदा बांधकामे बंद आहेत. अशी बांधकामे होत असतील तर आपण संबंधित प्रभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करू, असे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी वेळोवेळी माध्यमांना सांगितले आहे. आयुक्तांच्या आदेशाला बांधकामधारकांनी आव्हान दिल्याचे समजते.

आणखी वाचा-मुंबई नाशिक महामार्गावर कारला आग, महामार्गावर वाहतुक कोंडी

देवीचापाडा येथील बेकायदा चाळीची कारवाईसाठी पाहणी केली आहे. वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे या बेकायदा चाळीवर कारवाई केली जाणार आहे. -राजेश सावंत, साहाय्यकआयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली.

देवीचापाडा येथील बेकायदा चाळ जमीनदोस्त करण्यासाठी आपण ह प्रभाग अधिकाऱ्यांना आदेशीत करतो. -अवधूत तावडे, उपायुक्त, अतिक्रमण नियंत्रण.

Story img Loader