लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा येथील रेतीबंदर चौकाजवळ अतिथी हॉटेलच्या बाजुने नवी दिल्ली ते जेएनपीटी (उरण) समर्पित जलदगती रेल्वे मालवाहतूक मार्ग जात आहे. या रेल्वे मार्गिकेपासून ३० ते ३५ फूट अंतरावर भूमाफियांनी सात माळ्याची बेकायदा इमारत उभारणीचे काम जोमाने सुरू केले आहे.

uran karanja road potholes
उरण-करंजा मार्गाची दुरवस्था कायम
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
illegal godown of mandap materials on reserved plot for educational facility in dombivli
डोंबिवलीत पाथर्ली येथे पालिकेच्या शैक्षणिक सुविधेच्या आरक्षित भूखंडावर मंडप साहित्याचे बेकायदा गोदाम
Widening of Uran-Panvel road to be fourteen meters soon
उरण-पनवेल मार्ग लवकरच चौदा मीटर, सात कोटींच्या कामाची निविदा आचारसंहितेत अडकली
pune Hadapsar residents
हडपसर मधील नागरिक ‘ या’ कारणांमुळे त्रस्त !

रेतीबंदर चौका जवळील गावदेवी हाईट्स इमारतीच्या बाजुला आणि अतिथी हॉटेलच्या समोर मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर हिरव्या जाळ्या लावून रात्रंदिवस हे काम केले जात आहे. याच भागात गेल्या सहा महिन्याच्या काळात दोन बेकायदा इमारतींची कामे पूर्ण झाली. या इमारतींमध्ये भूमाफियांनी रहिवासी, दुकाने सुरू केली आहेत. आता या दोन बेकायदा इमारतींच्या बाजुला तिसरी बेकायदा इमारत उभारणीचे काम सुरू केले आहे.

आणखी वाचा-डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाटावर निवारा नसल्याने प्रवाशांची त्रेधातिरपिट

रेतीबंदर ते सत्यवान चौक ते स्मशानभूमी रस्ता कल्याण डोंबिवली पालिकेच्या विकास आराखड्यात १५ मीटरचा आहे. येत्या काळात या रस्त्याचे रुंदीकरण करायचे असेल या भागातील तिन्ही बेकायदा इमारती रस्ते कामाला अडथळा येणार आहेत.

मुसळधार पावसात घाईघाईने या बेकायदा इमारतीचे स्लॅब टाकले जात आहेत. तात्काळ भिंती रचण्याचे काम पूर्ण केले जात आहे. अतिशय निकृष्ट पध्दतीने या इमारतीची उभारणी केली जात आहे. या बेकायदा इमारतींपासून ३५ फूट अंतरावरुन रेल्वे मार्गिकेतून येत्या काळात मालगाड्या धावणार आहेत. या सततच्या धडधडीने या इमारतींनाही हादरे बसणार आहेत. हे माहिती असुनही भूमाफियांनी या इमारतीत राहण्यास येणाऱ्या कुटुंबियांचा विचार न करता पैशाच्या हव्यासापोटी या बेकायदा इमारतीची उभारणी सुरू केली आहे, असे स्थानिक रहिवासी सांगतात.

आणखी वाचा-मुंबई नाशिक महामार्गावर कंटेनरची जीपला धडक, सहा जणांचा मृत्यू तर तीन जण जखमी

आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी १० प्रभागांतील बेकायदा बांधकामे रोखण्यासाठी बीट मुकादम प्रत्येक प्रभागात नेमले आहेत. ह प्रभागातील बीट निरीक्षक अभियंता सुनील म्हादलेकर आणि त्यांचे पाच सहकारी तुकाराम साबळे, योगेश गवारी, दीपक ठोंबरे, नंदकिशोर राणे, बाळाराम भाग्यवंत यांना प्रभागातील रेतीबंदर चौकात मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर सुरू असलेल्या बेकायदा इमारतीचे काम दिसत नाही का, असे प्रश्न रहिवासी करतात.

आयुक्त डॉ. दांगडे यांनी रेतीबंदर चौकाजवळ नव्याने सुरू असलेली बेकायदा इमारत तातडीने जमीनदोस्त करण्याचे आदेश ह प्रभाग अधिकाऱ्यांना द्यावेत आणि या इमारतीच्या बाजुला उभ्या राहिलेल्या इतर दोन इमारत मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. या बेकायदा इमारतींवर अधिकारी वेळीच कारवाई करत नसल्याने भूमाफियांना बळ मिळत असल्याचे रहिवासी सांगतात.

आणखी वाचा-आटगाव येथे एक्सप्रेसच्या इंजिनमधील बिघाडामुळे रेल्वे वाहतूक १५ मिनिट उशिराने

याच इमारतीच्या पुढील भागात काळुबाई मंदिराजवळ जितू म्हात्रे, मुकेश म्हात्रे यांची बेकायदा माळ्याची रखडलेल्या स्थितीत इमारत उभी आहे. या इमारतीच्या चारही बाजूने बांधकामाची घाण पडली असून परिसरातील रहिवाशांना त्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. आयुक्तांनी देवीचापाडा भागात दौरा करुन या बेकायदा इमारतींची पाहणी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्याने रेतीबंदर चौकात कोणत्याही इमारतीला बांधकाम परवानगी विभागाने दिली नाही. सुरू असलेले बांधकाम बेकायदा असेल, असे सांगितले.