डोंबिवली : डोंबिवली येथील पश्चिमेतील देवीचापाडा भागातील काळुबाई मंदिराजवळील पालिकेच्या विकास आराखड्यातील १५ मीटर रस्त्यावर उभारण्यात येत असलेल्या सात माळ्याच्या बेकायदा इमारतीचे रखडलेले काम नव्याने सुरू करण्यात आले आहे. ‘एमआरटीपी’ गुन्हा दाखल झाल्यामुळे गेले काही महिने हे बांधकाम थांबले होते. परंतु आता पुन्हा हे काम सुरू झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पालिकेच्या ह प्रभागाचे तत्कालीन साहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे या इमारतीचे बांधकाम करणारे भूमाफिया जितू म्हात्रे यांच्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात ‘एमआरटीपी’चा गुन्हा तीन महिन्यापूर्वी दाखल झाला आहे. मागील काही महिन्यांपासून हे काम ह प्रभाग अधिकाऱ्यांनी दिलेल्या तंबीमुळे बंद होते. हे काम गेल्या आठवड्यापासून पुन्हा नव्याने सुरू करण्यात आले आहे. ही बेकायदा इमारत रहिवास योग्य करण्याच्या माफियांच्या हालचाली आहेत.

हेही वाचा >>> गृहनिर्माण सोसायटय़ांसाठी सहकार संवाद पोर्टल; एका क्लिकवर तक्रारी करणे शक्य

ही बेकायदा इमारतीमुळे पालिकेच्या विकास आराखड्यातील १५ मीटरचा रस्ता बाधित होत आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यापासून पाच मिनिटाच्या अंतरावर ही इमारत आहे. या बेकायदा इमारतीचे नव्याने काम सुरू झाले आहे. हे ह प्रभागातील बीट मुकादम यांना दिसून येत नाही का, असे प्रश्न रहिवासी करत आहेत. अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त प्रसाद बोरकर, ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त स्नेहा कर्पे यांनी या बांधकामाची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी देवीचापाडा रहिवाशांकडून केली जात आहे.

राहुलनगरकडे दुर्लक्ष

ह प्रभागातील राहुलनगर मधील चार माफियांना बेकायदा बांधकाम प्रकरणी नोटिसा दिल्या आहेत. या भूमाफियांनी पालिकेने कारवाई करण्यापूर्वी या इमारतीमधील रखडलेली कामे पूर्ण करण्यास सुरूवात केली आहे. या चारही बेकायदा इमारती निवासयोग्य करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. सुभाष रस्त्यावरील हनुमान मंदिराजवळील अशोक कांबळे या भूमाफियाने इमारत रहिवास योग्य करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. कुंभारखाणपाडा येथील बेकायदा इमारतींची कामे नव्याने सुरू करण्यात आली आहेत.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये इमारतीच्या पाचव्या माळ्यावरील घराला आग; जीवित हानी नाही

ह प्रभाग हद्दीत एकही बेकायदा इमारत भुईसपाट करण्याची कारवाई होत नसल्याने भूमाफियांना बेकायदा बांधकामे करण्यास बळ मिळत आहे, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले. महारेरा प्रकरणात समावेश असलेल्या डोंबिवली पूर्व, पश्चिमेतील बहुतांशी इमारतींमध्ये रहिवास सुरू झाला आहे. आयरे भागात वळण रस्ते मार्गात एका भूमाफियाने सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली आहे. त्याच्यावरही ग प्रभागाकडून कारवाई केली जात नसल्याचे आयरेतील रहिवाशांनी सांगितले.

“प्रशासकीय कामाचा खूप भार आहे. इतर कामांकडे लक्ष देता येत नाही. राहुलनगर, देवीचापाडा येथील कामांची माहिती वरिष्ठांना देऊन कारवाई केली जाईल.” – अरुण पाटील अधीक्षक, ह प्रभाग.