डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीतील बहुतांश कंपन्या बंद पडल्या आहेत. या ओस पडलेल्या कंपन्यांच्या जागेत जुनी उत्पादन प्रक्रियेची यंत्रणा कायम आहे. अशा बंद पडलेल्या कंपन्यांमध्ये जुजुबी ज्ञानाच्या आधारे अकुशल कामगार ठेऊन काही स्थानिक मंडळी काही बेकायदा उद्योग करत आहेत. हे उद्योग चोरून लपून सुरू असल्याने त्याकडे कोणाचे लक्ष जात नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Dombivli MIDC Blast: डोंबिवली बॉयलर स्फोट दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू, ४८ जखमी, मृतांची संख्या वाढण्याची भीती

कंपनी बाहेरून बंद, पण आतून जुन्या बाॅयलर, यंत्रणेचा वापर करून काही भेसळ उद्योग अशा कंपन्यांच्या माध्यमातून केले जातात. अशा भेसळीच्या वेळी एखाद्या रसायनाचा घटक वापरताना कमी जास्त झाला तर एखादी दुर्घटना घडते. त्यानंतर असे बेकायदा प्रकार उघडकीला येतात. कंपनीच्या दर्शनी भागाला टाळे आणि कंपनीच्या पडिक, मागच्या भागातून असले उद्योग काही मंडळी करत असल्याच्या तक्रारी आहेत. तपास यंत्रणांनी असे घातकी उद्योग शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal industries in the premises of most of close companies in dombivli midc zws