लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली- डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील स्कायायवॉकखाली रस्ता दुभाजकाजवळ काही प्रवासी दुचाकी वाहने उभी करुन ठेवतात. रस्ता अडवून उभ्या केलेल्या या वाहनांवर कारवाई होत नसल्याने बहुतांशी वाहन चालक रेल्वे स्थानका जवळील स्कायायवॉकखाली वर्दळीच्या रस्त्यात दुचाकी वाहने उभी करुन ठेवत आहेत. या सर्व वाहन चालकांवर पालिका आणि वाहतूक विभागाने कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
confusion among passengers after badlapur local departing from thane replaced with csmt local train
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ; अचानक मुंबई दिशेकडे जाणारी लोकल लावल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
traffic servants Dombivli, concrete road work Dombivli,
डोंबिवलीत काँक्रीट रस्ते कामांच्या ठिकाणी वाहतूक सेवकांची फौज

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात पाटकर रस्त्यावरुन इंदिरा चौकाच्या दिशेने स्कायायवॉकचा टप्पा गेला आहे. या रस्त्यावर दुभाजकाचा आडोसा घेऊन मुंबई, कसाराकडे जाणाऱ्या नोकरदार वर्गाकडून दुचाकी उभ्या केल्या जातात. कामावर जाताना दुचाकी स्कायायवॉकखाली उभ्या करायच्या. संध्याकाळी कामावरुन परतल्यावर त्यांचा ताबा घ्यायचा. याठिकाणी दुचाकी उभी केली की कोणताही दर लागत नाही. पालिका किंवा वाहतूक विभागाकडून रस्ता अडवला म्हणून कारवाई होत नाही, याची माहिती झाल्याने आता बहुतांशी वाहन चालक डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील स्कायायवॉकखाली दुचाकी वाहने उभी करुन ठेवत आहेत.

आणखी वाचा-डोंबिवलीत वाढदिवसाच्या दिवशी वडिलांची पत्नी, मुलांना मारहाण

पाटकर रस्त्यावरुन रिक्षा, मोटार, दुचाकी वाहने, पादचाऱ्यांची सतत वर्दळ असते. नोकरदारांच्या दुचाकीमुळे या या रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा येतो. या दुचाकींमुळे अनेक वेळा सफाई कामगारांना वाहने उभी असलेल्या भागात साफसफाई करता येत नाही, अशा तक्रारी आहेत. या रस्ता दुभाजकांमधील मोकळ्या जागेत वडापाव, इतर वस्तू विक्रीची दुकाने सुरू असतात. वडापाव विक्रेत्याच्या ठिकाणी ग्राहक रस्त्यावर उभे असतात. बाजुला केळकर रस्त्यावर रिक्षा वाहनतळ आहे. येथील रिक्षेत बसण्यासाठी प्रवाशांच्या कामत मेडिकल पदपथावर रांगा असतात. त्यामुळे डोंबिवली पूर्व भागात गर्दीने गजबजून गेलेला असतो. त्यात आता नोकरदार वर्ग रस्ता दुभाजकाजवळ दुचाकी आणून उभ्या करुन ठेवत असल्याने कोंडीत आणखी भर पडली आहे.

ही सगळी अराजकाची परिस्थिती पाहून शहरात प्रशासन शिल्लक आहे की नाही, असे प्रश्न उव्दिग्नपणे नागरिक करत आहेत. पाटकर रस्त्यावर मद्यविक्री करणारे एक दुकान आहे. अनेक ग्राहक दुकानातून मद्य खरेदी करुन समोर उभ्या असलेल्या दुचाकींवर बसून मद्य सेवन करतात. सार्वजनिक ठिकाणी हा प्रकार सर्रास सुरू असतो. शाळकरी मुले, महिला, प्रवासी रेल्वे स्थानकात येजा करताना याचेही भान मद्य सेवन करणाऱ्यांना नसते, अशा तक्रारी काही पादचाऱ्यांनी केल्या.

Story img Loader