ठाणे : ठाणे महापालिका परिवहन उपक्रमातील बसगाड्यांबरोबरच नवी मुंबई परिवहन सेवा आणि बेस्ट बसगाड्यांची ठाणे शहरातून वाहतूक होत असली तरी, बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसगाडी चालकांकडून परिवहनच्या थांब्यांवरून प्रवाशांची पळवापळवी करताना दिसून येत आहे. त्याचा फटका बेस्ट, ठाणे आणि नवी मुंबई परिवहन उपक्रमांना बसून त्याच्या उत्पन्नावर परिमाण होत आहे. त्यावर फारशी कारवाई होताना दिसून येत नाही.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या २७ लाखांच्या घरात गेली आहे. येथील प्रवाशांना महापालिका टिएमटीच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देते. ना नफा ना तोटा तत्वावर परिवहन उपक्रम चालविण्यात येतो. टिएमटीच्या ताफ्यात ४७४ बसगाड्या आहेत. परंतु प्रवाशांच्या मानाने टिएमटीच्या ताफ्यात पुरेशा बसगाड्या नाहीत. यामुळे टिएमटीकडून बसगाड्यांच्या संख्येत वाढ करण्यावर भर देण्यात येत आहे. सुरुवातीला परिवहन उपक्रमाच्या बसगाड्यांची वाहतूक शहरापुरतीच मर्यादीत होती. परंतु राज्याच्या परिवहन विभागाने बसगाड्यांची वाहतूक दुसऱ्या शहरातही करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे बेस्ट आणि नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसगाड्या ठाण्यातून प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. तर, ठाणे परिवहन उपक्रम मुंबई आणि नवी मुंबईत प्रवासी वाहतूक करित आहे.

term of Nagpur Zilla Parishad will end on 17th january and administrative rule will be imposed from Friday
जिल्हा परिषद ते महापालिका : प्रशासकीय राजवटीचे वर्तुळ पूर्ण
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
purchase of educational systems will be done through tendering Municipal Corporations Education Department clarified
टीका होताच महापालिका नरमली, निविदा काढूनच होणार शैक्षणिक प्रणालीची खरेदी!
Shiv Sena Thackeray group Nashik municipal elections
नाशिक महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार
Akola Municipal Corporation Election news in marathi
अकोला महापालिकेतील ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार?; संभाव्य निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान
Pune Municipal Corporation news in marathi
नदीचे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा ठरणारे बंधारे पालिका का काढणार, हे आहे कारण !
Contracts worth crores before land acquisition Municipal officials approve works worth Rs 22000 crore Mumbai news
भूसंपादनाआधी कोट्यवधींची कंत्राटे; महापालिका अधिकाऱ्यांकडून २२ हजार कोटींची खैरात

हेही वाचा – ठाणे : ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या महावितरणच्या बड्या अधिकाऱ्याला दणका

बेस्ट, ठाणे, नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बसगाड्या दुसऱ्या शहरातून प्रवासी वाहतूक करित असल्यामुळे तेथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळत असून त्याचबरोबर परिवहनच्या उत्पन्नाही वाढ होत आहे. ठाण्यात सर्वाधिक वाहतुकीचा मार्ग म्हणून ठाणे ते घोडबंदर हा ओळखला जातो. या मार्गावर बेस्ट, ठाणे, नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या बसगाड्या प्रवासी वाहतूक करतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर खासगी बसगाड्यांची बेकायदा वाहतूक सुरू आहे. या बसगाड्या परिवहनच्या बस थांब्यांवर थांबून प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. त्यावर कोणतीच कारवाई होत नसून या वाहतुकीमुळे बेस्ट, ठाणे, नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.

ठाणे परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात ४७४ बसगाड्या उपलब्ध आहेत. यातही काही बसगाड्या ठेकेदारामार्फत चालविल्या जात आहेत. ठाणे महापालिकेला शनिवार- रविवार वगळता दररोज सुमारे २५ लाख उत्पन्न मिळते. तर शनिवार-रविवारी यादिवशी दररोज सुमारे १९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु टिएमटी बसगाड्यांची वाहतूक ठरविलेल्या वेळापत्रकानुसार होत नाही. वाहतूक कोंडी तसेच इतर कारणांमुळे ही वाहतूक वेळेत होत नाही. अनेकदा प्रवाशांना सुमारे अर्धा तास विलंबाने बसगाड्या उपलब्ध होतात. या प्रवाशांना बेस्ट, नवी मुंबई महापालिका आणि मिरा भाईंदर महापालिकेच्या बसगाड्याही सुविधा उपलब्ध आहे. परंतु त्याही ठराविक वेळेत सोडण्यात येतात. त्याचाच फायदा घेऊन खासगी बसगाडी चालक परिवहन थांब्यांवरून प्रवासी पळविण्याचे काम करीत आहेत.

गेल्याकाही वर्षांत घोडबंदर भागात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. येथील नागरिक टिएमटी बसगाड्यांच्या वाहतुकीवर अवलंबून असतात. परंतु बसगाड्यांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे घोडबंदर पट्ट्यात ठाणे ते कोपरी आणि सिडकोपर्यंत या खासगी बसगाड्या धावू लागल्या आहेत. हे बसगाडी चालक टिएमटीचे प्रवासी पळवित आहेत. या बसगाड्यांचे तिकीट दर कमी आहे. अवघ्या काही मिनीटांत या बसगाड्या उपलब्ध होत असल्याने प्रवासी धोकादायकरित्या या बसगाड्यांतून प्रवास करत आहेत.

खासगी बसगाड्यांमुळे प्रवाशांच्या वाहतुकीवर परिणाम होत असतो. या बसगाड्यांच्या वाहतुकीमुळे दिवसाला सुमारे अडीच लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागते. प्रवाशांची पळवा-पळवी कमी करण्यासाठी आम्ही बसथांब्यांवर कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. तसेच, या बसगाड्यांवर कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन सेवेकडे छायाचित्र पाठविलेली आहेत. यामुळे मागील वर्षभरात प्रवासी संख्येमध्ये वाढ झाली आहे. – भालचंद्र बेहरे, टीएमटी, व्यवस्थापक.

ठाणे शहरात खासगी बसगाड्यांच्या वाहतुकीवर कारवाई केली जाते. त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे वायु पथकाची नेमणूक केलेली आहे. – हेमांगिनी पाटील, प्रादेशिक परिवहन अधिकारी.

ठाणे परिवहन उपक्रमाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार बसगाड्याची वाहतूक होत नाही. ऑनलाईन तिकीट सुविधांबाबत घोषणाबाजी करूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. पावसाळ्यात बसमध्ये पाणी गळती होत असते. बसथांब्यांवर प्रवासी बराच वेळ बसगाडीची वाट पाहत ताटकळत उभे असतात. बसगाडी आल्यानंतर काही प्रवासी रांगेत घुसखोरी करतात. या रांग मोडणाऱ्या प्रवाशांना अडवण्यासाठी वाहकाने मागील दरवाजाजवळ उभे राहायला हवे. मात्र, वाहक तेथे उभे राहण्याऐवजी चालकासोबत गप्पा मारताना दिसतात. ज्येष्ठ नागरिक तसेच इतर प्रवाशांशी अनेकदा वाहक उद्धटपणाने बोलतात. – अविनाश शिंदे, प्रवासी, आझादनगर

मी दररोज ठाणे स्थानक ते वर्तकनगर असा प्रवास करते. टीएमटी बसची सुविधा चांगली नाही. वेळेवर बसगाड्या येत नाहीत. कधी कधी एकाच वेळी २ ते ३ बसगाड्या सोडण्यात येतात. त्यानंतर अर्धा ते पाऊण तास एकही बस सोडली जात नाही. – अपर्णा देसाई, प्रवासी, वर्तकनगर

पातलीपाडा ते ठाणे स्थानक या ठिकाणी बसगाड्यांची सुविधा योग्य नाही. अर्धा तास ते एक तास उशिराने बसगाड्या प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध होतात. त्यामुळे कार्यालयात पोहचण्यास उशीर होतो. काही वाहकही हे प्रवाशांशी उद्धटपणाने बोलतात. सुट्टे पैसे न दिल्या कारणावरून वाहक हे वाद घालतात. – वंदना धुर्वे, प्रवासी, पातलीपाडा

ठाणे पश्चिमेतील सॅटीस पुलावरून दररोज उथळसरसाठी प्रवास करतो. ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या सोयी सुविधा चांगल्या आहेत. मात्र, मुंबईत झालेल्या बस अपघातानंतर प्रत्येक चालकास व्यवस्थितरित्या प्रशिक्षण देणे गरजेचे आहे असे वाटते. – मोहन भोसले, प्रवासी, ठाणे.

हेही वाचा – ठाण्यात टिएमटीचे कंत्राटी चालक अघोषित संपावर, नागरिकांचे हाल

मी अंबरनाथ शहरात राहतो. नोकरी निमित्ताने दररोज मला वाशीला जावे लागते. अंबरनाथ ते वाशी लोकल प्रवासात जास्त वेळ खर्चिक होत असल्यामुळे मी एनएमएमटीने प्रवास करतो. अनेकदा वाहतूक कोंडीमुळे हा प्रवास कंटाळवाणा वाटत असला तरी, लोकलच्या गर्दीपेक्षा सुरक्षित आहे. – अरुण नायर, अंबरनाथ

दररोज ऐरोली येथे जाण्यासाठी ठाण्याच्या चेंदणी नाका येथून जाणाऱ्या नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसने प्रवास करतो. या बसच्या सोयी सुविधा चांगल्या असल्या तरी अनेकदा लागोपाठ ४ ते ५ बस गाड्या सोडण्यात येतात. मात्र त्यानंतर अर्धा ते पाऊण तास बस गाडीची वाट पाहत राहावे लागते. – राजेश चाळके, प्रवासी, ठाणे (सिडको)

महाविद्यालयात येण्यासाठी तसेच जाण्यासाठी दररोज नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसने प्रवास होतो. अनेकदा एकाच वेळी सोडण्यात येणाऱ्या बस गाड्यांची संख्या अधिक असते. तर अनेकदा खुप वेळ थांबूनही बस उपलब्ध होत नाही. – वेदिका रपाटे, प्रवासी, ठाणे ( सिडको)

Story img Loader