लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

डोंबिवली: डोंबिवली जवळील २७ गावांमधील एका गावात सोमवारी काकानेच आपल्या १४ वर्षाच्या अल्पवयीन पुतणीवर वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आणखी वाचा-शाळेतील विद्यार्थी घेणार निसर्ग शिक्षण, ठाणे महापालिकेचा नवा उपक्रम

या प्रकाराबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारू अशी धमकी पिडीतेला दिली होती. त्यामुळे ती याविषयी तक्रार करण्यास पुढे येत नव्हती. आरोपीचा त्रास वाढू लागल्याने अखेर पीडितेने आपल्या आईला घडत असलेला प्रकार सांगितला. या प्रकाराने आई हादरली. तिने दिलेल्या तक्रारीच्या आधारे मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित मुलगी आपल्या आई आणि सावत्र वडिलांसह डोंबिवली जवळील एका गावात राहते. सावत्र वडिलांच्या भावाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मागील वर्षभर हा प्रकार सुरू होता.