अंबरनाथः एका हत्येच्या घटनेने अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली. अंबरनाथमध्ये पतीनेच पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ पूर्वेतील पालेगाव परिसरातील एका रहिवासी संकुलात मंगळवारी ही घटना घडली. पालेगाव परिसरातील पार्श्व हिल्स सोसायटीत विकी लोंढे हा पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसह वास्तव्याला होता. या दोघांचा ३ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांना एक वर्षाची मुलगी देखील आहे. या दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून सतत वाद होत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

याच वादातून मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास विकी याने त्याच्या पत्नीवर चाकूने वार करत गळा चिरून तिची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर आरोपी विकी घरातून पसार झाला. याबाबत रात्रीच्या सुमारास पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. हत्येचे नेमके कारण अजूनही कळू शकलेले नाही. या घटनेनंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आला. तर आरोपी विकी लोंढे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली असून ती वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. या घटनेवर हळहळ व्यक्त होत असून एक वर्षाच्या चिमुकलीचे मायेचे छत्र हरपले आहे.