बदलापूरच्या जंगलात गुप्तांग कापलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती ३० ते ४० वयोगटातील आहे. मृतदेहावर भोसकल्याच्या अनेक खूणा आहेत तसेच दातही तुटलेले आहेत.

चिंचावली गावातील मोतीराम गावांडा हे मंगळवारी सकाळी पिंपळादाराच्या जंगलातून जात असताना सर्वप्रथम त्यांच्या नजरेस हा मृतदेह पडला. त्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली.

बदलापूर पोलिसांनी तपास सुरु केला असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. सूड भावनेतून अत्यंत क्रूर पद्धतीने या व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे.

Story img Loader