बदलापूर : नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार बदलापुरात समोर आला आहे. ही महिला उल्हासनगर येथे वास्तव्यास होती. एका हॉटेलवर गुंगीचे औषध देऊन त्यानंतर अभिषेक सिंग या व्यक्तीने महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात गुंगीचे औषध, मद्य पाजून बलात्कार केल्याच्या काही घटना बदलापुरात समोर आल्या आहेत.

हे ही वाचा… सॅटीससह तीन महत्त्वाच्या उड्डाणपुलांचे मुंबई आयआयटी मार्फत परिक्षण

हे ही वाचा… कल्याण : २७ गावांचे पाण्याचे दुर्भिक्ष्य संपणार, अमृत योजनेमुळे २७ गावांमध्ये १०५ दलघमी पाण्याची साठवण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन दिवसांपूर्वी बदलापूर शहरातील एका हॉटेलमध्ये ४५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला. ही महिला उल्हासनगर येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करते. ही महिला समाज माध्यमातून अभिषेक सिंग नामक व्यक्तीशी संपर्कात होती. नोकरी देण्याचे आमिष दाखवून सिंग याने या महिलेला बदलापुरात एका हॉटेलमध्ये मुलाखतीसाठी बोलावले. येथे गुंगीचे औषध पेयातून देण्यात आले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे. गेल्या महिन्यात मुंबईतील एका महिलेला मद्य पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार बदलापूर शहरात समोर आला होता. तर त्यापूर्वी मैत्रिणीच्या घरी आलेल्या तरुणीवर अशाच प्रकारे अत्याचार केल्याची घटना समोर आली होती.