भाईंदर : कोट्यावधी रुपये खर्च करून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेल्या वर्सोवा पुलावर खड्डे व तडे जाऊ लागल्याने अवघ्या नऊ महिन्यातच त्याच्या दुरुस्तीचे काम महामार्ग प्राधिकरणाने हाती घेतले आहे.यापूर्वीच निष्कृष्ट दर्जाचे काम केल्याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई तसेच ठाण्याहून पालघर आणि गुजरातला जाण्यासाठी घोडंबदर येथील वर्सोवा खाडी पार करावी लागते. या खाडीवर पहिला पूल १९६८ मध्ये बांधण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा पूल कमकुवत झाल्याने जुन्या वर्सोवा पुलाच्या शेजारी नवीन वर्सोवा पूल तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सुरू करण्यात आले होते.हा पूल ४ मार्गिकेचा असून जानेवारी २०१८ मध्ये या पुलाच्या कामाला सुरुवात झाली होती. यासाठी जवळपास २७५ कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला आहे.त्यानुसार २८ मार्च २०२३ या पुलावरील एक मार्गीला वाहतुकीसाठी सुरु करण्यात आली होती. तेव्हापासून या मार्गीकेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून प्रवाशांची वाहतूक कोंडीत सुटका झाली आहे. मात्र पावसाळ्यात नवीन पुलावर खड्डे पडल्याचे तसेच सिमेंट रस्त्यांना तेडे गेल्याचे दिसून आले होते. त्यामुळे पुलाच्या गुणवत्ते बाबत प्रश्न उपस्थित करीत प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात होता.

हेही वाचा : सोने मिळाले… पण मालकाचा शोध लागेना, पोलिसांची पंचायत

या संदर्भात लोकप्रतिनिधीनी आक्रमक भूमिका घेतल्याने पुलाच्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर आता या पुलाला भक्कम करण्याच्या दुष्टीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने  पाऊले उचलली आहेत.त्यानुसार पुलावर खडी व इतर साहित्य आणून पुन्हा रस्ता तयार करण्याचे काम हाती घेतले जात असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : नव्या वर्षात फेब्रुवारीअखेर ठाणेकरांचा प्रवास होणार गारेगार, पीएम ई बस योजनेतून शंभर विद्युत बसगाड्या उपलब्ध होणार

ठेकेदाराकडून दुरुस्ती

नव्या वर्सोवा पुलाची मुंबई सुरत अशी मार्गिका खुली होताच त्यावर खड्डे पडले होते. या खड्ड्यांची दुरुस्तीचे काम ठेकेदाराकडून करवून घेतले जात आहे. यात डांबरीकरण व मास्टिक वापरून ही दुरुस्ती केली जात असल्याने महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प निर्देशक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे. डिसेंबर अखेर पर्यंत ही सर्व दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाणार आहे असेही चिटणीस यांनी सांगितले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In bhaindar new versova bridge is being repaired after potholes on the bridge due to rain css
Show comments