भाईंदर : शिवसेना शिंदे गटाने मीरा भाईंदर येथे उभारेलल्या कंटेनर शाखेला बेकायदेशीर वीज जोडण्या असल्याचे समोर आल्यानंतर अदानी वीज समूहाने याविरोधात कारवाई सुरू केली आहे. अदानी वीज समूहाने या कंटेनर शाखेला असलेल्या बेकायदेशीर वीज जोडण्या तोडण्यास सुरूवात केली आहे.

शिवसेना शिंदे गटाने शहरात वर्चस्व स्थापन करण्यासाठी जागोजागी कंटेनर शाखा उघडल्या होत्या. या शाखांचे उद्घाटन नुकतेच आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले होते. मुख्य रस्त्यावर, चौकाचौकात उघडलेल्या या शाखा चर्चेचा विषय ठरल्या होत्या. या बेकायदेशीर कंटेनर शाखांना शिवसेना (उद्धव ठाकरे गट ) आणि काँग्रेसने विरोध करून कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण पेटले आहे. या बेकायदेशीर शाखांना देण्यात आलेल्या वीज पुरवठ्याबाबत अदानी वीज समूहाकडे बऱ्याच तक्रारदारांनी तक्रारी केल्या आहेत.

हेही वाचा : कल्याण ‘आरटीओ’चे प्रदूषण नियंत्रणासाठी वाहन तपासणी भरारी पथक, प्रदूषणकारी १३० हून अधिक वाहनांवर कारवाई

अशा बेकायदेशीर शाखांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी अदानी वीज समूहाकडून एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने बुधवारी कंटेनर शाखेने चोरीचा घेतलेला वीज पुरवठा खंडीत करण्यास सुरूवात केली. याशिवाय यापुढे अशा प्रकारे वीज बेकायदेशीर घेल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Story img Loader