ठाणे : भिवंडी शहरात शासनाच्या परवानगी शिवाय सुरु असलेल्या १८ अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर पालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. या शाळांवर कारवाई करण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरू केली असून त्याचबरोबर , या शाळांमध्ये शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आपल्या पाल्यांचे प्रवेश घेवू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील ८१ अनधिकृत शाळांविरोधात प्रशासनाने काही दिवसांपूर्वी कारवाई केली होती. या ८१ अनधिकृत शाळांविरोधात पालिका प्रशासनाने पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहे. यानुसार,६८ शाळांवर गुन्हे दाखल तर, १३ शाळांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. याशिवाय, या शाळांची नळ जोडणी खंडित करण्यात आली असून शाळांच्या बांधकामावर अतिक्रमण विभागाकडूनही कार्यवाही प्रस्तावित करण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेनेही शहरात शासनाच्या परवानगी शिवाय सुरु असलेल्या १८ अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर पालिका प्रशासनाने जाहीर केली आहे.

भिवंडीत अनधिकृत शाळांवर फौजदारी कारवाई

या शाळेतील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. तसेच संबंधित अनधिकृत शाळांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीची नोटीस बजावली असुन संबंधीतांवर लवकरच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती भिवंडी मनपा प्राथमिक शिक्षण विभागा मार्फत देण्यांत आलेली आहे.

अनधिकृत शाळेचे नाव आणि ठिकाण

रॉयल इंग्रजी शाळा (पटेल कंपाउंड धामणकरनाका, भिवंडी), नोबेल इंग्रजी शाळा (अवचितपाडा, भिवंडी), अलरजा उर्दू प्राथमिक शाळा ( गैबी नगर भिवंडी), मराठी प्राथमिक शाळा (पाईप लाईन टेमघर भिवंडी), इंग्रजी प्राथमिक व माध्यमिक शाळा (पाईप लाईन टेमघर भिवंडी), द लर्निंग प्राथमिक शाळा (टेमघर पाडा भिवंडी), एकता इंग्रजी पब्लिक शाळा ( फातमा नगर नागांव भिवंडी), एकता उर्दू पब्लिक शाळा (फातमा नगर नागांव भिवंडी), ए आर रेहमान उर्दू प्राथमिक शाळा ( फातमा नगर नागांव भिवंडी), जवेरिया उर्दू प्राथमिक शाळा (गैबी नगर भिवंडी), विवेकानंद इंग्रजी माध्यमिक शाळा ( नवी वस्ती भिवंडी), डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम इंग्रजी प्राथमिक शाळा ( रावजीनगर, पॉवर हॉऊस जवळ, भिवंडी), अलहिदाया पब्लिक प्राथमिक शाळा (पटेल नगर बाळा कंपाउंड, भिवंडी), तहजीब इंग्रजी प्राथमिक शाळा ( जैतनपुरा भिवंडी ), इकरा इस्लामिक मकतब शाळा (नदी नाका भिवंडी), कैसर बेगम इंग्रजी शाळा ( नागांव, साहारा होटल जवळ, भिवंडी), फरहान इंग्रजी प्राथमिक शाळा (दिवान शाह दर्गा रोड भिवंडी ), गीतांजली माध्यमिक शाळा (गायत्रीनगर व-हाळेदवी, भिवंडी ) या १८ शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत. या शाळांमध्ये शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आपल्या पाल्यांचे प्रवेश घेवू नयेत, असे आवाहन भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यांत आले आहे.