ठाणे : भिवंडी येथील रांजनोली भागातील ‘सी रोझ बार अँड रेस्ट्राॅरंट’ या ऑर्क्रेस्टा बारवर भिवंडी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा मारला. या बारचा व्यवस्थापक आणि अश्लील हावभाव करून नृत्य करणाऱ्या महिला वेटर यांच्यासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: चार जून नंतर काहींचा करेक्ट कार्यक्रम; मतदानानंतर पाटील-कथोरे वाद पेटला

Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Case registered against school cashier for embezzling Rs 16 lakh Pune news
शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
thane police arrest
कल्याणमधील पत्रीपुलाजवळ प्रतिबंधित कोडीन औषधाच्या बाटल्या जप्त
ganja ulhasnagar court case
उल्हासनगर न्यायालयात चपलांच्या खोक्यातून गांजा पुरवण्याचा प्रकार; अज्ञात आरोपीचे न्यायालयाच्या खिडकीतून उडी घेत पलायन
Traffic police and Municipal Corporation are trying to speed up traffic in Pune news
पिंपरी: खंडणीखोरांविरोधात आक्रमक; औद्योगिक तक्रार निवारण पथकामार्फत ११ गुन्हे दाखल
Meter inspector suspended in bribery case
पिंपरी : लाच प्रकरणातील मीटर निरीक्षक निलंबित
Pune, kidnappers , Crime Branch action,
पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण

रांजनोली येथे रात्री उशीरापर्यंत सी रोझ हा ऑर्क्रेस्टा बार सुरू असल्याची माहिती भिवंडी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी सी रोझ बार अँड रेस्ट्राॅरंटवर छापा मारला. बारमध्ये मद्यपान करत असलेल्या गिऱ्हाईकांना येथील महिला वेटर अश्लील हाव भाव करत मद्य देत असल्याचे पथकाला निदर्शनास आले. याप्रकरानंतर पोलिसांनी तात्काळ हा प्रकार थांबविला. सोमवारी पहाटे पोलिसांनी याप्रकरणात बारच्या व्यवस्थापकासह कर्मचारी आणि महिला वेटर विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader