ठाणे : भिवंडी येथील गोवा नाका भागात मंगळवारी पहाटे कापड गोदामाला भीषण आग लागली आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी गोदामातील साहित्य जळून खाक झाले आहे. सहा तासांपासून येथील आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य अग्निशमन दलाच्या पथकांकडून सुरू आहे.
हेही वाचा : कल्याणमध्ये बारावे जलशुध्दीकरण केंद्राची जलवाहिनी फुटली
गोवा नाका येथील सरवली भागात कापड निर्मितीचे गोदाम आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास या गोदामाला अचानक भीषण आग लागली. अवघ्या काही क्षणात आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे आग अधिकच पसरत गेली. घटनेची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिल्यानंतर भिवंडी, कल्याण आणि ठाणे महापालिका अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाले. सकाळी उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य पथकांकडून सुरू आहे. गोदामात कोणीही अडकले नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.