कल्याण : मुंबईतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी औरंगाबाद भागातून आलेल्या शिवसैनिकांच्या बसला बुधवारी पहाटे चार वाजता मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर जवळील कळंभे गावाजवळ अपघात झाला. या अपघातात १४ शिवसैनिक किरकोळ जखमी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेळाव्यासाठी आलेल्या शिवसैनिकांसोबत रुग्णवाहिका होती. जखमी शिवसैनिकांना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या शिवसैनिकांच्या हात, पाय, डोक्याला मार लागला होता. त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना रात्रीच उपचार करून सोडण्यात आले. अपघातानंतर काही वेळानंतर हे शिवसैनिक औरंगाबद, सिल्लोड दिशेने रवाना झाले.

हेही वाचा… डोंबिवली : काटई-बदलापूर रस्त्याची दुरवस्था; खड्डे, खडी आणि धुळीने चालक, प्रवासी हैराण

औरंगाबाद, सिल्लोड, नांदेड, चाफेवाडी, बीड भागातून अनेक शिवसैनिक बस करून मुंबईत आझाद मैदान येथील दसरा मेळाव्यासाठी आले होते. मेळावा संपल्यानंतर या शिवसैनिकांनी मुंबईत भोजन केले. त्यांनी रात्रीच गावी जाण्यासाठी विशेष बसमधून प्रवास सुरू केला. शहापूर जवळील कळंभे गावाजवळ मध्य प्रदेशात चाललेल्या एका कंटेनर चालकाने समोर चाललेल्या बसला जोराची धडक दिली. या धडकेत ती बस पलटी झाली. धडक देणारे कंटेनर वेगाने मागे आला. त्याचवेळी शिवसैनिक असलेली बस धडकणाऱ्या कंटेनरवर पाठीमागून आदळली. पहाटेच्या वेळेत गाढ झोपेत शिवसैनिक होते. अचानक मोठा आवाज होऊन बस रस्त्याच्या कडेला थांबली. धडकेमुळे बसमधील शिवसैनिकांना हात, पाय, डोक्याला दुखापती झाल्या.

हेही वाचा… ठाण्यातील १९ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार; महापालिका आणि खासगी शाळांमधील शिक्षकांचा गौरव

आवाजाच्या दणक्याने कळंभे गावातील ग्रामस्थ बचावासाठी घटनास्थळी दाखल झाले. शहापूर पोलीस, वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
या अपघातानंतर एक तास या भागातील वाहतूक विस्कळीत झाली होती. जखमींना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे जखमी प्रवाशांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सोडण्यात आले. उपलब्ध बसने शिवसैनिक पहाटेच सिल्लोडच्या दिशेने रवाना झाले, अशी माहिती पोलीस, स्थानिक रहिवाशांनी दिली.

हेही वाचा… माजिवडा-कापूरबावडी चौकात कोंडी वाढण्याची शक्यता; येत्या दोन दिवसांत माजिवडा परिसरात मेट्रोच्या महत्त्वाच्या कामांना सुरूवात

या अपघाताची माहितीत तातडीने मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंना देण्यात आली. त्यांनी जखमींंवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना केल्या. प्रवास सुरक्षितपणे करण्याच्या सूचना केल्या.

जखमींची नावे

मंगल बाभोर, हरी दुधे, हेमंत पंडित, अफसर शहा, बालाजी निबीड, साबीर शेख, विजय सुंदर, शिवाजी पाटील, ईश्वर ढोके, मुस्ताफ मोहम्मद, गोकुल साळवी, शोएब शेख, महादु गुंटर, रोहिदास भारदे, कादील भोराटी. हे सर्व जखमी २२ ते ३२ वयोगटातील आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In bus accident near shahapur fourteen shiv sainik from aurangabad injured who attended eknath shinde dussehra rally at azad maidan asj
Show comments