ठाणे : दिवा येथील खर्डीगाव भागात सात गोदामे जळून खाक झाल्याचा प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला. या गोदामांमध्ये पाच भंगाराची, एक प्लास्टिक गोदाम आणि एक लाकडाची वखार होती. या घटनेत कोणीही जखमी झाले नसले तरी या आगीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. तसेच आगीचे लोट निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खर्डीगाव येथील चौधरी कंपाऊंड परिसरातील एका खुल्या मैदानात पाच भंगाराची गोदामे, लाकडी वखार आणि प्लास्टिकचे गोदाम आहे. मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास या गोदामांना अचानक आग लागली. गोदामामध्ये प्लास्टिक आणि लाकूड असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. धुराचे आणि आगीचे लोट हवेत पसरले होते. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर दिवा, मुंब्रा आणि शीळ येथील अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविताना अग्निशमन दलाच्या जवानांना नाकी नऊ आले होते. स्थानिक रहिवाशांनी देखील अग्निशमन दलाच्या जवानांची मदत केली. अखेर तीन तासांच्या प्रयत्नानंतर येथील आगीव नियंत्रण मिळविणे जवानांना शक्य झाले. या आगीमध्ये गोदामे संपूर्ण जळून खाक झाले आहेत.