ठाणे : राज्यात एकत्रित सत्तेवर असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या दोन्ही मित्र पक्षांच्या ठाण्यातील दिवा भागातील पदाधिकाऱ्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद रंगला असतानाच, आता रुग्णालय उभारणीच्या मागणीवरून दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादाला तोंड फुटले आहे. रुग्णालय उभारणीच्या मागणीसाठी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाची शिवसेनेचे उप शहर प्रमुख आदेश भगत यांनी समाज माध्यमांवर खिल्ली उडवत बदनामी केल्याचा आरोप करत याप्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती दिवा भाजपचे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी दिली आहे. यामुळे दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमधील वाद आता पोलिस ठाण्यापर्यंत पोहचल्याचे चित्र आहे.

राज्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचे सरकार आहे. हे सरकार स्थापन झाल्यानंंतर दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रित येऊन कार्यक्रम साजरे करताना दिसत आहे. ठाणे शहरातही असेच काहीसे चित्र असले तरी दिवा परिसरात मात्र दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. येथील दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते परस्पर विरोधी भुमिका घेताना दिसून येत असून यामुळेच दोन्ही गटात वाद रंगला आहे. ठाणे महापालिकेत गेले अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता असून विद्यमान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचा कारभार सुरु होता. या कारभारावरच बोट ठेवत भाजप सातत्याने शिंदे गटाची कोंडी करताना दिसून येत आहे. असे असतानाच, आता रुग्णालय उभारणीच्या मागणीवरून दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वादाला तोंड फुटले आहे.

Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath shinde, shiv sena role, Airoli, belapur assembly election
ऐरोलीतील बंडखोरांना शिंदे गटाचे अभय? बेलापुरात कारवाई, ऐरोलीत आस्ते कदम
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
seven people dismissed from Shiv Sena Shinde party
शिवसेना (शिंदे) पक्षातील सात जणांची हकालपट्टी
eknath shinde comment ladki bahin yojana daryapur vidhan sabha
मुख्‍यमंत्री म्हणतात, मी शंभरवेळा तुरूंगात जाण्‍यास तयार…कारण…
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात

हेही वाचा… ठाकुर्ली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ ‘पैसे भराआणि वाहने उभी करा’ योजनेला प्रारंभ

हेही वाचा… मुंबई, ठाण्यातील सराईत चोरटे; डोंबिवलीत मोबाईल चोरीत अटक

दिवा परिसरात रुग्णालय उभारणीच्या मागणीसाठी भाजपच्या महिला पदाधिकारी ज्योती पाटील यांनी नुकतेच आंदोलन केले. या आंदोलनावरून दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली होती. त्यापाठोपाठ आता हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत गेला आहे. महिलांनी केलेल्या आंदोलनाची शिवसेनेचे उप शहर प्रमुख आदेश भगत यांनी समाज माध्यमांवर खिल्ली उडवत बदनामी केल्याचा आरोप दिवा भाजपचे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केला आहे. ‘बंटी आणि बबलीच्या आंदोलनाकडे दिवावासियांसोबत स्थानिक पदाधिकारी आणि ठाण्यातील नेत्यांनी फिरवली पाठ, अशा आशयाचे संदेश आदेश भगत यांनी दिवा न्यूज या व्हाट्सअप ग्रुप वर टाकून भाजपच्या आंदोलनाची खिल्ली उडवत दिव्यातील महिलांचा अपमान केला, असा आरोप भाजप अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केला आहे. याप्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असून त्यात भगत यांच्यावर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे, असेही मुंडे यांनी सांगितले.