लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिकेचे फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त, महसूल विभागातील मंडल अधिकारी, तलाठी यांच्या आशीर्वादाने दोन वर्षापूर्वी ठाकुर्ली जवळील कांचनगाव (खंबाळपाडा) मधील गुरचरण जमिनीवर भूमाफियांनी सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली. ही इमारत खासगी जमिनीवर, पालिका, महसूल विभागाच्या आवश्यक परवानग्या घेऊन अधिकृतपणे उभारली आहे. असे घर खरेदीदार, बँक अधिकाऱ्यांना सांगून त्यांची बनावट कागदपत्रांच्या आधारे दोन वर्षाच्या कालावधीत दोन कोटी ३६ लाख ९० हजार ३२५ रुपयांची फसवणूक करणाऱ्या १३ भूमाफियांच्या विरुध्द फसवणूक झालेल्या १२ घर खरेदीदारांच्या तक्रारी वरुन टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Thieves stole gold ornaments and ₹55,000 cash from an elderly woman at Navsha Maruti temple
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
minister abdul sattar Attempt to grab industrial plots
शिक्षण संस्थेच्या नावाखाली औद्योगिक भूखंडावर डोळा, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या खेळीस अधिकाऱ्यांच्या सजगतेमुळे चाप
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Malegaon ed investigation 125 crore rupees scam
मालेगावातील कोटींच्या उड्डाणांची ईडी चौकशी
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील कोणत्याही इमारतीत घरे खरेदी करण्यापूर्वी नागरिकांनी पालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम कागदपत्रांची खात्री करावी, असे आवाहन पालिकेतर्फे वारंवार करुनही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्याचा फटका घर खरेदी फसवणुकीत होत आहे. ठाकुर्ली पूर्व भागातील कांचनगाव खंबाळपाडा येथील गुरचरण जमिनीवर मे. कृष्णा कन्स्ट्रक्शन या कंपनीने कृष्णा व्हिला ही बेकायदा इमारत दोन वर्षाच्या कालावधीत उभारली. हवेशीर, मोकळी जागा त्यामुळे नागरिकांनी या इमारतीत इमारत बांधकाम कागदपत्रांची पडताळणी न करता २५ लाखापासून पुढील किमतील या बेकायदा इमारतीत घरे खरेदी केली. यासाठी बँकांकडून गृहकर्ज घेतले. विकासकाने घरे विकताना या इमारतीत ज्या सुविधा देण्याचे आश्वासन खरेदीदारांना दिले होते. ते पाळले नाही.

हेही वाचा…. दिवा-वसई दोन रेल्वे पॅसेंजर सकाळच्या वेळेत सोडण्याची प्रवाशांची मागणी; खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांना ७०० प्रवाशांचे निवेदन

कृष्णा व्हिला इमारती मधील १२ घर खरेदीदारांनी इमारतीची जमीन मालकी, पालिकेची बांधकाम मंजुरी कागदपत्रे, अकृषिक कागदपत्रे यांची अलीकडे विविध कार्यालयांमध्ये चौकशी केली. त्यांना ती सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गुरचरण जमीन असताना ती आपल्या खासगी मालकीची असल्याचे रखमाबाई काळण, चंद्राबाई काळण, दत्ता काळण, बाळा काळण, संगीता काळण यांनी खरेदीदारांना खोटे सांगून बनावट साताबारा उतारे तयार केले. या जमिनीवर इमारत उभारणीसाठी मे. कृष्णा कन्स्ट्रक्शनचे शोभाराम चौधरी यांच्या बरोबर कुलमुखत्यार केले, असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा…. कल्याणमध्ये पती-पत्नीच्या भांडणात पोलिसांना बेदम मारहाण

इमारत बांधून घर खरेदीदारांनी फसवणूक करणाऱ्या १३ माफियांच्या विरुध्द टिळकनगर पोलीस ठाण्यात खरेदीदार तानाजी बबन जाधव आणि इतर ११ यांनी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पालिकेच्या फ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त, मंडळ अधिकारी, तलाठी या महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा बेकायदा गृहप्रकल्प उभा राहिला आहे. काही वाद्ग्रस्त निवृत्त पालिका अधिकाऱ्यांचा या भागातील बेकायदा बांधकामांमध्ये सक्रिय सहभाग असल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

गुन्हे दाखल भूमाफिया

मे. कृष्णा कन्स्ट्रक्शन (रा. ठाकुर्ली), शोभाराम चेनाजी चौधरी (शिव भोळे सोसायटी, पाथर्ली), सखाराम घिसारामजी चौधरी (रा.रिध्दी सिध्दी पार्क, चोळे, ठाकुर्ली), विपुल दलाराम चौधरी (रा. वक्रतुंड सोसायटी, खारीगाव, कळवा), विनोद विपुल चौधरी, शेषाराम उर्फ संजय घिसारामजी चौधरी, शारदा शेषाराम चौधरी, अश्विनी खरात, रखमाबाई काळण चंद्राबाई काळण, दत्ता सुकऱ्या काळण, बाळा सुकऱ्या काळण, संगीता सुनील काळण (सर्व राहणार कांचनगाव).