डोंबिवली: स्नॅपचॅट उपयोजन मोबाईलमध्ये स्थापित करून समाज माध्यमांच्या नाहक संपर्कात राहू नको, अशी सूचना डोंबिवलीतील निळजे येथील लोढा हेवन मध्ये राहत असलेल्या वडिलांनी आपल्या १६ वर्षाच्या मुलीला केली होती. तरीही वडिलांचे न ऐकता मुलीने स्नॅपचॅट उपयोजना गुपचूप स्थापित केले. यावरून वडिल ओरडल्याने राग अनावर झाल्याने मुलीने आपल्या राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन शुक्रवारी रात्री आत्महत्या केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संभाजी सदाशिव पाटील (४२) असे तक्रारदार वडिलांचे नाव आहे. त्यांंनीच आपल्या मुलीच्या आत्महत्या प्रकरणाची माहिती मानपाडा पोलिसांंना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. स्नॅपचॅटच्या माध्यमातून स्वताची छायाचित्रे काढून ती समाज माध्यमात पसरविता येतात. यामधून इतर प्रतीक्षेतील समाज माध्यमी अशा छायाचित्रांना आपल्या परीने पसंती देतात. हा प्रकार योग्य नसल्याने आणि त्याचा दुरूपयोग होण्याची शक्यता होती. त्यामुळे संभाजी पाटील यांनी आपल्या सोळा वर्षाच्या मुलीला स्नॅपचॅट उपयोजन आपल्या मोबाईलमध्ये स्थापित न करण्यास सांगितले होते.

हेही वाचा : डोंबिवलीत क्लिनरने बेदरकारपणे टेम्पो चालविल्याने वस्तू वितरक तरूणाचा मृत्यू

तरीही वडिलांचे न ऐकता तिने मोबाईलमध्ये स्नॅपचॅट स्थापित केले. ही माहिती वडील संभाजी पाटील यांना समजताच, त्यांनी याविषयी मुलीसमोर नाराजी व्यक्त करून तिला असा प्रकार पु्न्हा न करण्यास बजावले होते. वडिलांचा सल्ला न आवडल्याने आणि राग अनावर झाल्याने संभाजी यांच्या अल्पवयीन मुलीने घरातील शय्या गृहात शुक्रवारी रात्री साडे वाजताच्या दरम्यान ओढणीने गळफास घेतला.

हेही वाचा : विधानसभा निवडणुकीत लोक तुमच्या डोळ्यात अंजन घालतील, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

रात्री उशिरा हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आला. त्यानंतर पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. साहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli 16 year old girl commits suicide after father opposes her to download snapchat css