Old Woman Selling Drugs to Student : लहान मुलांना, नातवंडांना गोळ्या- चॉकलेटं देऊन कौतुक करायचं, त्या वयात आजीबाई शाळेतल्या विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून मिरवली जाणाऱ्या डोंबिवलीत हा प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे.
हेही वाचा – कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश
‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, डोबिवली पोलिसांनी शाळेच्या मुलांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षीय महिलेला अटक केली आहे. सलमा नूर मोहम्मद शेख असं या महिलेचं नाव आहे. ही महिला गेल्या काही महिन्यांपासून शाळेच्या मुलांना ड्रग्ज विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय कदम यांनी एक पथक तयार केले. या पथकाद्वारे महिनाभर शाळेच्या छतावरून महिलेवर पाळत ठेवण्यात येत होती. अखेर पोलिसांनी महिलेला तिच्या राहत्या घरातून अटक केली.
हेही वाचा – कल्याणमधील बारावे कचरा प्रकल्पाला पुन्हा भीषण आग, दहा दिवसाच्या कालावधीत दुसऱ्यांदा आग
विशेष म्हणजे या महिलेला २०१५ सालीदेखील ड्रग्जविक्रीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांनंतर तिची तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतही या महिलेने पुन्हा ड्रग्ज विकणे सुरु केले. यासंदर्भात बोलताना डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे म्हणाले, आरोपी महिलेला ड्रग्जविक्रीच्या आरोपाखाली तिच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. तसेच तिच्या घरातून ६ लाख रुपये रोख आणि १०४ ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करण्यात आले आहे.