डोंबिवली : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील शिळफाटा रस्त्यावरील निळजे गाव हद्दीत एका जवाहिऱ्याच्या दुकानाच्या जाहिरात फलकावर कळवा येथील मेसर्स ए. डी. प्रमोशन ॲडव्हर्टायझिंग सर्व्हिसेस एजन्सीने पालिकेची परवानगी न घेता पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रिय घोषणांची जाहिरात झळकवली होती. याविषयी निवडणूक आयोगाच्या सीव्हिजील उपयोजनवर सोमवारी तक्रार प्राप्त होताच, आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी संबंधित जाहिरात रात्रीतून उतरवून त्या जाहिरात एजन्सीवर मालमत्तेचे विद्रुपीकरण आणि आचारसंहिता भंग प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने पोलिसांंनी गुन्हा दाखल केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका जाहिरात एजन्सी विरुध्द आचारसंहितेचा भंगाचा गुन्हा दाखल झाल्याची ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील ही पहिली घटना आहे. पोलिसांनी सांगितले, लोकसभा निवडणुकीची आचारसंंहिता लागू असल्याने कोणत्याही राजकीय पक्षाला परवानगी घेऊनच जाहिरात करण्याची परवानगी आहे. सोमवारी संध्याकाळी निवडणूक आयोगाच्या सीव्हिजील या उपयोजनवर डोंबिवली जवळील शिळफाटा रस्त्यावरील निळजे गाव हद्दीत विना परवानगी पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेची फलक लागलेली आहेत, अशी तक्रार प्राप्त झाली होती.

Tents erected for voting in Dombivli obstruct traffic
डोंबिवलीत मतदानासाठी उभारलेल्या मंडपांचा वाहतुकीला अडथळा
manoj shinde reaction on leaving congress and joing shivsena shinde group
विरोधक मुक्त मतदारसंघाकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष
Temperatures drop in Thane district lowest temperature recorded in Badlapur
ठाणे जिल्हा गारेगार! बदलापुरात सर्वात कमी तापमानाची नोंद
Sexual harassment case against private hospital employee in Kalyan
कल्याणमध्ये खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्याविरुध्द लैंगिक छळाचा गुन्हा
shiv sena ubt candidate rajan vichare and bjp candidate sanjay kelkar won in thane
राजन विचारेंची केवळ राबोडीत तर, संजय केळकरांची संपुर्ण ठाण्यात गाडी सुसाट
117 candidates got less than 500 votes in the assembly elections in Thane district
ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीत ११७ उमेदवारांना ५०० हून कमी मते
Mahatma Phule and Ghanshyam Gupte roads in Dombivli West face daily traffic jams
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते, फुले रोड एक दिशा मार्ग
In Thane district BJP won 9 out of 9 seats and cm Eknath Shinde won 6 out of 7 seats
मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात भाजपची सरशी

हेही वाचा : “कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर

या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार आणि फेरीवाला हटाव पथकातील सर्जेराव जाधव, गणपत गायकवाड, प्रकाश म्हात्रे, गणेश दळवी, अमित गायकर, विलास पाटील, रतन खुडे, भगवान पाटील असे पथक शिळफाटा रस्त्यावरील संबंधित जाहिरात फलक शोधण्याच्या कामासाठी लागले. सोमवारी रात्री नऊ वाजता त्यांना शिळफाटा रस्त्यावरील निळजे गाव हद्दीत एका जवाहिऱ्याच्या अधिकृत फलकावर १२ मजली उंचीचा ४० बाय ४० फूट लांबी रूंदीचा फलक लावलेला आढळला. या फलकावर ‘मोदींनी चार कोटी पक्की घरे बांधली आहेत. आणखी बांंधली जातील. ही मोदींची गॅरंटी आहे. पुन्हा मोदी सरकार स्थापन करा,’ असा पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेसह मजकूर लिहिलेला आढळला.

हेही वाचा : उष्णतेमुळे भटक्या प्राण्यांना निर्जलीकरणाचा त्रास, मुंबई, ठाण्यामध्ये सहा दिवसांत ३१६ तक्रारी

साहाय्यक आयुक्त पवार यांनी या जाहिरात फलकाच्या अधिकृततेविषयी मालमत्ता विभागाकडे चौकशी केली. त्यावेळी हा फलक कळवा खारीगाव येथील मे. ए. डी. प्रमोशन जाहिरात एजन्सीने लावला असल्याचे आणि त्यांनी हा फलक लावताना पालिकेची परवानगी घेतली नसल्याचे उघड झाले. पालिका हद्दीत विनापरवानगी जाहिरात फलक लावून मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याने आणि आचारसंंहितेचा भंग केल्याने साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी मे. ए. डी. प्रमोशन जाहिरात एजन्सी विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.